समाजसेविका सपना विरेंद्र म्हात्रे यांनी घेतली कोरोनाची तिसरी लस



प्रेस मीडिया लाईव्ह :

विरेद्र म्हात्रे

 नवी मुंबई : समाजसेविका सपना विरेंद्र म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 19जुलै) दुपारी कोरोनाची लस घेत  नवी मुंबईतील नागरिकांनाही कोरोनाच्या विळख्यातून शहराला  वाचविण्यासाठी कोरोनाची लस  लवकरात लवकर घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा जीवनावश्यक गरजा मानल्या जात होत्या. आता गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या विळख्यात आपला देश अडकला आहे. या विळख्यातून सुटका झाली तरच अनेक समस्यांचे आपोआपच निवारण होवून देशाला प्रगतीपथावर घेवून जाणे शक्य आहे. वर्षभरात उद्योगधंदे ठप्प आहे, बेरोजगारी वाढली आहे, बालक-पालक घरातच आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता सर्वाचाच पुढाकार हवा. सर्वाचेच योगदान हवे. बोलण्यातून नव्हे तर कृतीतून योगदान द्या.  मंगळवारी दुपारी समाजसेविका सपना विरेंद्र म्हात्रे यांनी कोरोना महामारीवरील लस घेत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. कोरोना नियत्रंणासाठी लसीकरण आवश्यक आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. चला तर मग, वेळ का दवडता, मुहूर्ताची वाट पाहत आहात का? नाही ना, मग आजच तुम्हीही स्वत: लसीकरण करून समाजापुढे कोरोनामुक्तीचा आदर्श ठेवा, असे आवाहन समाजसेविका सपना विरेंद्र म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांना यावेळी यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post