बेकायदेशीररित्या गावठी कट्टे तसेच जिवंत काडतुस विक्री करणा-या इसमांस केले जेरबंद....

 रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उत्तम कामगिरी...

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

बेकायदेशीररित्या गावठी कट्टे तसेच जिवंत काडतुस विक्री करणा-या इसमांस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग- रायगड, यांनी केले जेरबंद

मौजे दांडफाटा ते रसायनी जाणारे रोडवर अवैधरित्या एक इसम गावठी कटटा -बंदुक विक्री करीता बंद जुन्या टोलनाक्या जवळ येणार असल्याबाबतची खात्रीशीर गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हवालदार/श्री. राजेश पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार श्री. दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ. शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली छापाकारवाई करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोसई / श्री. महेश व्ही. कदम व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते.

नमूद पथकास मिळालेल्या गोपनिय बातमीदारामार्फत सविस्तर माहीती काढुन मौजे दांडफाटा ते रसायनी जाणारे रोडवर बंद जुन्या टोलनाक्या जवळ सापळा रचुन एक इसमांस ताब्यात घेतले असुन त्याचे नाव इब्राहीम मोहम्मद उमर शेख वय. ३८, रा. चित्ता कॅम्प, दोस्ती हॉटेलचे जवळ, म्हाडा ट्रॉम्बे मुंबई असे आहे. त्यास ताब्यात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याचेकडे असलेल्या बॅग सँग, मधुन २ गावठी कटटे तसेच दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. वरील आरोपीत याचे विरुध्द रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १०५/२०२२ हत्यार कायदा कलम १९५९ चे कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक/ महेश व्ही. कदम, स्था.गु. अ. शाखा रायगड हे करीत आहेत.

● जप्त मुददेमाल

१) २५,०००/- रुपये किंमतीची एक ६ इंच लांबीची लोखंडी नळी असलेला गावठी कटटा त्यास धरण्यास लाकडी अवरण असलेली मुठ असा पिवळसर धातुचा गावठी कट्टा (बंदुक) जुवाकिंअ.

२) २५,००० /- रूपये किंमतीची एक ६ इंच लांबीची लोखंडी नळी असलेला • गावठी कटटा त्यास धरण्यास लाकडी अवरण असलेली मुठ असा काळे रंगाचा गावठी कट्टा (बंदुक) जुवाकिंअ.

३) १,००० /- रूपये किंमतीचे दोन ८ एम. एम. पितळी राउंड यावर •पाठीमागे KF8MM असे लिहीलेले प्रत्येकी ५००रु. किमतीचे कि.अ.

४) १००/ रूपये किमतीची एक निळे रंगाची बॅग-सँग जुवाकिंअ.

•सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार श्री. दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. अ. शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक / श्री. एम. व्ही. कदम, पोह. / राजेश पाटील, पोह. / यशवंत झेमसे पोह. / प्रतीक सावंत, पोह. / राकेश म्हात्रे, चालक सहा. फौजदार / देवराम कोरम यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आले.

Post a Comment

Previous Post Next Post