मजरेवाडी येथील जमीन क्षारपड मुक्तीचे काम वाखाणण्याजोगे

 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे प्रतिपादन.

प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ /प्रतिनिधी:

 आपल्या शेताचा आणि गावाचा विकास आपण स्वत:च करावयाचा असतो हे मजरेवाडी गावाने दाखवून दिले आहे. अतिशय मेहनतीने आणि वेगाने पडीक जमीन परत एकदा लागवडीखाली आणण्यासाठी येथील शेतकरी अतिशय कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ही धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी खूप अभ्यासाने आणि तळमळीने क्षारपड जमीन मुक्तीचा प्रकल्प यशस्वी केला आहे. ते शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नतेचे मार्ग दाखवित असून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या कामाला साथ द्या, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले

मजरेवाडी (ता. शिरोळ) येथे मुख्य पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून ५०० एकरावर अंतर्गत सच्छिद्र निचरा प्रणालीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ, दत्तचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल रेखावार हे बोलत होते.

    गणपतराव पाटील म्हणाले, क्षारपड मुक्तीचे आदर्श काम तरुण पुढे होऊन करीत आहेत. त्यामुळे ही योजना लवकरच पूर्णत्वास येऊन याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्येही दत्त पॅटर्नच्या या कामाचे कौतुक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिरोळच्या या दत्त पॅटर्नचे काम महाराष्ट्राला आणि देशाला भूषण असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी सातत्याने प्रयोग करून आपली जमीन क्षारपड मुक्त करून आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 


माझी वसुंधरा या अभियानामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे काम उत्कृष्ट झाल्याने शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा सन्मान केल्याबद्दल यावेळी शेतकऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी दत्तच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे, कारखान्याचे सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, सौ. सुजाता पाटील, कॉन्ट्रॅक्टर किर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, अकिवाट सरपंच विशाल चौगुले, संजय सुतार, बापू खराडे, महावीर पट्टणकुडे, भूपाल बुबनाळे, पायगोंडा पाटील, शिरीष कागले, रविंद्र नरुटे, आप्पासाहेब नरुटे, बुद्धिराम पाटील, बाळासो जुगळे, मारुती कोकणे, पोपट मडिवाळ, सुहास पट्टणकुडे, महेश बुबनाळे, सतीश कागले, मल्लय्या मठपती, अशोक चव्हाण, सुकुमार खुरपे, भैय्या नरुटे, योगेश चव्हाण, धोंडीराम साबळे, जनार्दन मांजरे, जयपाल मडिवाळ, अमोल मडिवाळ, अमोल पट्टणकुडे, अजित कागले, जनार्दन नरुटे, वसंत नरुटे, संतोष चव्हाण, किशोर जुगळे, भालचंद्र खुरपे, जयपाल खेमाणे, नितीन खेमाणे, महादेव चव्हाण, अनिल मडिवाळ, सम्मेद खेमाणे, आनंदा परीट, आनंदा बदामे, पिंटू आरबाळे, नंदकिशोर पाटील, विनायक परीट, महेश नरुटे, गणेश ढवळे, शेखर कागले, किशोर जुगळे, नानासो हिरुकुडे  यांच्यासह श्रीहरी क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी, मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post