मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक

 पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी -पालकमंत्री बाळासाहेब पाटील .


प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा, दि.2 (जिमाका): निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत आहे. यामुळे आपत्ती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीत जीवित  व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि विभाग प्रमुखांनी मान्सून कालावधीत मुख्यालय सोडू नये, असे निर्देश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मान्सून पूर्वतयारी व  आपत्ती व्यवस्थापन आढावा  बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावात प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस विभागाने संयुक्त पहाणी करावी. आपत्ती हातळण्यासाठी आपत्ती व्यवस्थानाकडे असलेल्या यंत्रणेची तपासणी करावी. जलसंपदा विभागाने संबंधित विभागांशी संपर्कात रहावे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यास पाणी कालव्याद्वारे सोडावे आणि त्याबाबत जनतेला वेळोवेळी सूचित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व  नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. मान्सून कालावधीत धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी धरणस्थळी थांबावे. 


Post a Comment

Previous Post Next Post