ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त आहे का..?

असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे .  तर याची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे यांनी ट्विट करून शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांची पक्ष प्रतोदपदी निवड केल्याची माहिती दिली. शिंदे यांच्या या कृतीने थेट उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिल्याचं मानलं जात आहे. अशात आता ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त झाला का..? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.


शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावून समर्थक आमदारांसह थेट गुजरातमधील सूरत गाठले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार परत येतील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याशी चर्चेचा प्रयत्नही झाला. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे आतापर्यंतच्या घडामोडींवरून तरी लक्षात येत आहे.

शिंदे यांना पक्षाने गटनेते पदा वरून हटवल्यानंतर परतीचे दार जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जात होते. त्यात आता पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे शिंदे यांनी ट्विटरवरून जाहीर केले. एकप्रकारे शिवसेनेवर शिंदे यांनी दावा करून उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त आहे का..? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत राजकीय विश्लेषक, पत्रकार यांनी विविध मते व्यक्त केली आहेत.

राज्यसभा निवडणुकीपासूनच या शक्यतेची कुणकुण लागली होती. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना जास्त कोटा द्यायचा, शरद पवार यांनी रणनीती ठरवली होती. पण या रणनीतीला सेनेतील नेत्यांनी विरोध केला. परिणामी संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. उद्धव ठाकरे साधे नेते आहेत, त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा फार अनुभव नाही. शरद पवार यांनी जर बंडखोरीचा निरोप पाठवला होता, तर ठाकरेंनी सावध राहायला हवे होते, पण तसे झाले नाही, हे गंभीर आहे. या संदर्भात आता खरे सत्य बाहेर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हातून ही चूक कधीच झाली नसती, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post