इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला ६ वर्षासाठी एन.बी.ए.ऍक्रिडिटेशनप्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी(डिप्लोमा)ला फार्मसी डिप्लोमा गटात   नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडिटेशन कडून ६ वर्षासाठी एन बी ए ऍक्रिडिटेशन मिळाले आहे. हा बहुमान मिळविणारी ही देशातील पहिली इन्स्टिट्यूट आहे,अशी माहिती इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ.व्ही.एन.जगताप यांनी दिली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, सचिव प्रा.इरफान शेख  यांनी इन्स्टिट्यूटचे अभिनंदन केले. 

यापूर्वी ३ वर्षासाठी हे ऍक्रिडिटेशन मिळाले होते.आता मिळालेले एक्रिडिटेशन २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापर्यंत आहे. डॉ.पी.ए इनामदार म्हणाले,'हे एक्रिडिटेशन हा एक बहुमान असून इन्स्टिट्यूटचे प्राचार्य,प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता आणखी  वाढविण्यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे.'  

प्राचार्य डॉ.व्ही.एन.जगताप म्हणाले,'सातत्यपूर्ण प्रयत्नातून,शैक्षणिक धोरण आणि परस्पर संवादी शिक्षण यामुळे  हे यश साध्य झाले आहे.जागतिक पातळीवरील अत्याधुनिक सुविधा,प्रशिक्षण,तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असल्याने सर्वोत्तम  शैक्षणिक आस्थापना म्हणून ओळख मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू'.  

Post a Comment

Previous Post Next Post