प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलावप्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठेवलेली आहेत. अशा वाहनांचा लिलाव दि. 15 जून रोजी सकाळी 11 ते सायं. 3 या वेळेत ई-लिलाव पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.

       यासाठी इच्छुकांनी होम पेजवर Bidder enrollmant ह्या ऑप्शनमध्ये नोंदणी करावी. या ऑप्शनमध्ये भाग घेण्याऱ्यास ऑनलाईन शुल्क 500 रूपये, रुपये भरावे लागेल. डीपॉझीटसाठी शुल्क धनाकर्ष (डी.डी.) 50 हजार रूपये तसेच 29 रिक्षा व 3 ट्रक करिता 1 लाख कार्यालयात जमा करणे बंधनकारक असेल. अयशस्वी लिलावधारकांना डीपॉझीट स्वरूपातील डी डी परत करण्यात येतील. सदरचा डी.डी. ॲकाऊंट ऑफिसर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस कोल्हापूर यांच्या नावे काढण्यात यावा. शासन फी शुल्क 500 रू. शासन जमा करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

  www.eauction.gov.in या संकेत स्थळावर दि. 7 जून पासून माहिती उपलब्ध राहील. 


Post a Comment

Previous Post Next Post