जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२

निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर.

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि.२४: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

 पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागरचनेस विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ४ व परिशिष्ट ४ (अ) सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post