रिझवानी मस्जिद तर्फे वारकऱ्यांना जेवण


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : काल  पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत मोमीनपुरा, गंज पेठ येतील मुस्लिम बांधवांनी  एकत्रित येऊन केले.  रिजवानी मस्जिदच्या वतीने दिंडी करिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.  जेवणाबरोबर  शिरखुर्मा (मिष्ट पदार्थ) हे ही होते. . 


सामाजिक ऐक्याची भूमिका मांडणाऱ्या रिजवानी मस्जिदच्या या कार्यात शिक्षण हक्क मंचाचे उर्दू विभागातील विध्यार्थी तसेच स्थानिक पुढारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील होते.  मस्जिद चे विश्वस्त हाजी अंजुम शेख व उस्मान अरब व नईम तांबोळी यांनी गुलाबाची फुले देऊन वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यावेळेस रवीन्द्र माळवदकर, वहाब मणियार, मुस्लिम बँकेचे संचालक श्री सय्यद मोहम्मद गौस उर्फ बबलू भाई  , मशकूर शेख, बबलू शरीफ, बबलू सय्यद, ऐशा तांबोळी, इत्यादी सामील होते. आजम कॅम्पस, पुणे तर्फे कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता. 


                              

Post a Comment

Previous Post Next Post