५०७ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा 'मरणोत्तर नेत्रदान संकल्प 'प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक दृष्टीदान  दिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रम पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात  झाला. ५०७ कार्यकर्त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचे फॉर्म भरुन संकल्प केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्षा डॉ.सुनिता मोरे व कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार वंदनाताई चव्हाण, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी स्वतःचे मरणोत्तर नेत्रदानाचे फॅार्म भरुन या उपक्रमाचा शुभारंभ केला.

या कार्यक्रमाला अंकुश काकडे,प्रदीप देशमुख, अॅड. भगवानराव साळुंखे हे मान्यवर उपस्थित होते..या उपक्रमास पक्षाचे पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
Post a Comment

Previous Post Next Post