आप पक्षाकडून पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन

आप महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार..

प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे : राज्यात महागरपालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू  आहे. राज्यातील महाविकास आघाडी  सरकार विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत येत्या काळात महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे . राज्य निवडणूक आयोगाने 14 महानगरपालिकांना 31 मेपर्यंत प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत नुकतीच प्रक्रिया पार पडलीय. यानंतर आता पुण्यातूनच एक बातमी समोर आली आहे. पुण्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात असून त्यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. आप पक्षाकडून पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मेळाव्याला दिल्ली सरकारमधील ‘आप’चे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर प्रीती मेनन, निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांचीही उपस्थिती असणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. मेळाव्याच्या माध्यमातून आप महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे.

पुणे महानगरपालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण पाहूया

- अनुसूचित जाती

- एकूण जागांची संख्या - 173

- पैकी महिलांकरिता आरक्षित जागा - 12

पुणे महापालिका अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग

 • प्रभाग 9 - येरवडा
 • प्रभाग 3 - लोहगाव, विमाननगर
 • प्रभाग 42 - रामटेकडी, सय्यदनगर
 • प्रभाग 47 - कोंढवा बुद्रुक
 • प्रभाग 49 - मार्केटयार्ड, महर्षीनगर
 • प्रभाग 46 - महम्मदवाडी उरळी देवाची
 • प्रभाग 20 - पुणे स्टेशन, आंबेडकर रोड
 • प्रभाग 26 - वानवडी, वैदुवाडी
 • प्रभाग - 21 कोरेगाव पार्क, मुंढवा
 • प्रभाग 48 - अप्पर इंदिरानगर
 • प्रभाग 10 शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी
 • प्रभाग - 4 खराडी वाघाली

अनुसूचित जमाती

- एकूण जागांची संख्या - 173

- पैकी महिलांकरीता आरक्षित जागा - 01

अनुसूचित जमाती

 • प्रभाग 1 क्र. - 1 ब महिला
 • प्रभाग 14 अ - एसटी खुला

सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)

- एकूण जागांची संख्या - 173

- पैकी महिलांसाठी आरक्षित जागा - 74

Post a Comment

Previous Post Next Post