आप पुणे जनसंवाद आणि नवीन कार्यकर्ते पक्ष प्रवेश सोहळा घोरपडी, हडपसर येथे शनिवारी संपन्नप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे मनपा निवडणुकीत शड्डू ठोकलेल्या आम आदमी पक्षाने पुण्याच्या गल्ली बोळात पक्ष विस्ताराचे काम हाती घेतलेले आहे आणि त्यास जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या परंपरागत धर्मांध राजकारणाला बगल देत सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक या मुद्द्यांवर आम आदमी पक्ष (आप) जनते पुढे जात आहे. आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार आणि राज्य प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष पुण्यात जोरदारपणे पक्ष विस्ताराचे कार्य करत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवार दि. १८ जून रोजी हडपसर मधील घोरपडी (प्रभाग क्र. २१) येथे जनसंवाद तसेच पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी या परिसरातील तरुण सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई कांबळे यांच्यासह सुमारे ३० नवीन कार्यकर्त्यांनी आप राज्य प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर काका मुजुमदार, प्रभाग समन्वयक विद्यानंद नायक यांच्या प्रमुख उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला.

सोहळ्यातील उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अभिजीत मोरे यांनी दिल्ली सरकारच्या कामाची माहिती दिली तसेच आम आदमी पक्ष पुणे माहापालिकेत सत्तेत आल्यास शिक्षण, आरोग्य, महिलांसाठी मोफत बस प्रवास यासह आप पुणेच्या जाहिरनाम्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात या परिसरातील आप कार्यकर्ते अभिजीत गायकवाड, विद्यानंद नायक, किशोर काका मुजुमदार, आप जलहक्क आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब कांबळे यांनी समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले.

यावेळी फॅबियन अण्णा सॅमसन, अन्वर शेख, श्रीधर उपाध्या, ऍड. मनोज माने, निलेश वांजळे, यशवंत बनसोडे, सुनंदा जाधव, पीटर डीसुजा, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, कनिष्क जाधव आदी आप कार्यकर्ते तसेच  या परिसरातील नागरिक उपस्थित होते.Post a Comment

Previous Post Next Post