घरफाळा- पाणीपट्टी वाढ रद्द न केल्यास माकपचा आंदोलनाचा इशारा

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : अन्यायकारक घरफाळा व पाणीपट्टी वाढ रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी कबनूर ग्रामपंचायतीला माकपच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड आनंदा चव्हाण यांनी दिला. 

   कबनूर  गावातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत व्हावी , पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी , घरफाळा योग्य पध्दतीने आकारावा , गावठाण हद्दवाढीबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी ,गावच्या लोकसंख्येच्या मानाने आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा कार्यक्षम करावी , योग्य सुविधांसह प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा द्यावा ,

डॉक्टरसह आरोग्य सेवक आणि औषधोपचाराची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन माकपच्या वतीने  आनंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामविकास अधिकारी गणपती यांची भेट घेऊन त्यांना सादर केले.

या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व शिष्टमंडळातील पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. चर्चेअंती दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून येत्या आठ दिवसात ग्रामपंचायतीकडून नागरी सुविधासंबंधी योग्य कार्यवाही न झाल्यास व लेखी उत्तर न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल ,असा इशारा त्यांनी दिला. यावेळी किशोर पाटील प्रवीण जाधव यांच्यासह माकपचे बंडा पाटील उत्तम चौधरी , विरूपाक्ष शनीगौंडा, सुभाष माने, विजय कोरे, विष्णू धामणकर, लतिफ फकीर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post