पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट

 पुण्यात काँग्रेस नव्या कारभाऱ्याच्या शोधात .

प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. काँग्रेसच्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे पाठवल्याचं कळतंय. यामुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट झालंय.

पाच वर्षांपेक्षा जास्त पदावर असलेल्यानी पदं रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. मागील आठवड्यात नगरच्या शिर्डीत राज्य काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी चिंतन शिबिरात हाच नियम राज्यात लागू करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर पुण्याला नवं नेतृत्व मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिर्डीत झालेल्या अधिवेशनात 51 जणांनी तातडीने राजीनामे सुपूर्द केले होते. यामध्ये रमेश बागवे आणि अभय छाजेड यांचा समावेश आहे. रोहित टिळक यांचं नाव देखील समोर आलंय. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून छाजेड आणि टिळक पुण्यात काँग्रेसचं काम पाहात होते.पक्षातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. तर पुण्यात काँग्रेस नव्या कारभाऱ्याच्या शोधात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post