पुण्यातील स्वारगेट भागात ट्रॅव्हल चालकाकडून बलात्काराच्या घटनेत आरोपाला शिक्षा होईपर्यंत शिवसेना आणि स्त्री आधार केंद्र पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे...

 सदरील घटनेत कडक कारवाई करण्याचे डॉ.गोऱ्हे यांचे पुणे पोलिस प्रशासनास निर्देश...

स्त्री आधार केंद्राच्या वतीने दिली आर्थिक मदत


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दि.१४ : पुण्यात बाहेर गावावरून पतीसोबत पहाटे आलेल्या एका दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यासाठी मदत करतो असून सांगून चालकाने अचानक ट्रॅव्हल्स कात्रज परिसरात नेहून महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात जेव्हा पती वॉशरूमला गेला चालकाने हे कृत्य केले आहे. यासंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखक घेतली असून पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

सदरील पीडित जोडपे पुण्यात नवीन असल्याने ते झोपण्यासाठी खोली शोधात होते. यावेळी आरोपी ट्रॅव्हल चालक नवनाथ भोंगने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. यावेळी हे घटना घडली असून यातील आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. याघटनेत स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या अनिता शिंदे व आश्लेषा खंडागळे यांनी डॉ.गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार पीडित कुटुंबाला मदत करून त्यांचे समुपदेशन केले आहे. त्याचबरोबर त्यांना तात्पुरती आर्थिक मदत देखील डॉ.गोऱ्हे यांनी स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून केली आहे. डॉ.गोऱ्हे यांनी तपास अधिकारी श्री. येवले यांनी आरोपीला तात्काळ अटक केली याबद्दल देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. 

या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून चार्जशीट कोर्टात दाखल होऊन आरोपीना शिक्षा होईपर्यंत शिवसेना आणि स्त्री आधार केंद्र पिडीत कुटुंबाच्या पाठीशी भक्कम उभी असेल, असा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाला दूरध्वनीवरून दिला आहे.Post a Comment

Previous Post Next Post