दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरीता ब्रेल लिपीतील पुस्तक भेटप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:- दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरीता लिहिलेले व प्रकाशित केलेले'अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी'  हे ब्रेल- इंग्रजी भाषेतील पुस्तक नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, येरवडा, पुणे यांच्या ग्रंथालयांना डॉ. तुषार निकाळजे  यांनी  भेट दिले  आहे.


तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षण शास्त्र विभागातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे ग्रंथालयास, अहमदाबाद, सिंहगड रोड( पुणे) येथील दृष्टिहीन विद्यार्थिनींच्या केंद्रास सदर पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या  आहेत. डॉ. तुषार निकाळजे यांनी या पुस्तकाची स्वतः निर्मिती केली आहे.  विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठांच्या विभागनिहाय कामांची थोडक्यात ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाला विंग्ज पब्लिकेशन्स, पुणे यांनी गोल्डन बुक अवार्डने सन्मानित केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी दृष्टहिन  विद्यार्थ्यांकरीता साहित्य निर्मिती  करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या  आहेत.. 

                     याप्रसंगी डॉ. तुषार निकाळजे म्हणाले,  "लुई ब्रेल यांनी निर्मिती केलेली ब्रेल लिपी कालबाह्य होऊ नये म्हणून माझ्यासारख्या प्रत्येक लेखकाने किंवा कवीने दृष्टिहीन व्यक्तींकरिता एखादेतरी साहित्य निर्माण करावे असे वाटते. तसेच दृष्टिहीन व्यक्तींना देखील प्रवाहात आणण्यासाठी माझा हा एक प्रयत्न आहे".

Post a Comment

Previous Post Next Post