ग्रामसेवक महालिंग लक्काप्पा अकिवाटे यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे...

 दि . १६/६/२०२२ पासून खिद्रापूर ग्रा.पं.च्या पाण्याच्या टाकीवर गणेश पाखरे यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. 

उपोषणाचा आज चा तिसरा दिवस , कोणीही प्रशासकीय अधिकारी उपोषण स्थळाकडे अद्याप फिरकले देखील नाहीत.


प्रेस मीडिया लाईव्ह :

खिद्रापूर :    लोकशाही दिनी दिलेल्या तक्रार अर्जावर कोणतीही कार्यवाही न करणारे ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी गावातील एलान फाँडेशनने दत्तक घेतलेल्या कामकाजाची सर्व कागद पत्रे उपलब्ध करुन घेतल्या शिवाय ग्रामपंचायत कार्यालयात पाय ठेवल्यास प्राणत्याग करीत असले बाबत .... या आशयाचे निवेदन आपणास देऊनही कोणतीही कार्यवाही न झालेने  दि . १६/६/२०२२ पासून बेमुदत आमरण उपोषण खिद्रापूर ग्रामपंचायती समोर सुरू केले आहे.  आज उपोषणाचा तिसरा दिवस असून , अद्याप कोणीही प्रशासकीय अधिकारी उपोषण स्थळाकडे अद्याप फिरकले देखील नाहीत

 मौजे खिद्रापूर ता . शिरोळ हे गाव अभिनेता सलमान खान यांनी दत्तक घेतले आहे व महापुरग्रस्त लोकांची घरे बांधून देणेकामी एलान फडिशन व जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेत करार होऊन येथील घरांचे बांधकाम चालू करणेत आले होते . मौजे खिद्रापूर येथील कामकाज पाहणे कामी सदर करारानुसार तत्कालिन ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांची नियुक्ती करणेत आली होती . पण सदर ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांनी स्वत : ची बदली झालेनंतर सदर कामाबाबतची कोणतीही माहिती व कागदपत्रे विद्यमान ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांचेकडे दिलेली नाहीत . त्यामूळे गावातील उर्वरित घरांचे बांधकाम अद्याप स्थगित झाले आहे . यामुळे गावाचे खुप मोठे नुकसान झाले आहे . कागदपत्रांची करीत असलेली लपवा लपवी ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून त्यांची ही वर्तणूक सदर कामात भ्रष्टचार झालेचे सिद्ध करीत आहे . तसेच अर्जदार यांनी लोकशाही दिनाकरीता कोल्हापूर येथे २८ आक्टोबर २०२१ रोजी अर्ज दिला होता . सदरचा अर्ज कार्यवाही होणेकामी ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांचेकडे ३१ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त झाला असून सदर अर्जावर ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही अथवा सदरचा अर्ज कसला आहे हे पाहिले देखील नाही . सदरचा अर्ज हा दप्तरी डांबून ठेवणेचे काम केले आहे 

या बाबत विचारणा केली असता तत्कालिन ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांनी गावात चालू असलेल्या व एलान फौडेशनने दत्तक घेतलेल्या चालू असलेल्या घर बांधकामाची कोणतीही कागदपत्रे दिली नसलेचे सांगतात . सदर एलान फंडिशनमार्फत गावात घराचे बांधकाम चालू झाले पासून तत्कालिन ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांना आमच्या घराचे बांधकाम घेण्याबाबत विनंती करीत आहोत . पण वारंवार काहीही कारणे सांगून तसेच आमच्या बाबत खोट्या अफवा पसरवून आमची बदनामी करण्याचे प्रयत्न करीत आले आहेत . आमच्याकडून पैसे घेऊन सुद्धा आमच्या घराचे बांधकाम करणेस तयार नाहीत . त्यामूळे कर्तव्यात कसूर करणारे खिद्रापूर ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक श्री . महालिंग लक्काप्पा अकिवाटे यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे या मागणीसाठी तसेच त्वरीत आमच्या घराचे बांधकाम त्वरीत चालू न केलेस दि . १६/६/२०२२ पासून खिद्रापूर ग्रा.पं.च्या पाण्याच्या टाकीवर बेमुदत आमरण उपोषण  सुरू केले आहे .तसेच सदरचा अर्ज मिळाले तारखेपासून लोकशाही दिनी दिलेल्या तक्रार अर्जावर कोणतीही कार्यवाही न करणारे ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी गावातील एलान फाँडेशनने दत्तक घेतलेल्या कामकाजाची सर्व कागदपत्रे उपलब्ध करून घेतल्या शिवाय ग्रामपंचायत कार्यालयात पाय ठेवल्यास प्राणत्याग करीत आहे याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे  . 

तसेच आम्हा कुठंबीयांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडलेस विषयात नमुद व्यक्तीच जबाबदार असतील याची नोंद घ्यावी . या वस्तूस्थितीचे निवेदन आपणास देऊनही कोणतीही कार्यवाही न झालेने आज दि . १६/६/२०२२ पासून बेमुदत आमरण उपोषण खिद्रापूर ग्रामपंचायती समोर सुरू केले आहे , पण अद्याप कोणताही प्रशासकीय अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नाही. . सदरचे निवेदन मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , जिल्हाधिकारी कोल्हापूर , प्रांत अधिकारी  , जिल्हा पोलिस प्रमुख , व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे


प्रेस मीडिया लाईव्ह

Post a Comment

Previous Post Next Post