झाशीच्या लक्ष्मीबाई राणीच्या १६४ व्या बलिदान दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी किल्याला भेट देऊन केले वंदन...प्रेस मीडिया लाईव्ह :

दिनांक १७ जून, २०२२, झांसी, (उ. प्र) : आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यातील संघर्षाचे स्मरण करून त्यांच्या स्मारकाला भेट देऊन शिवसेना उपनेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले. यावेळी त्या म्हणाल्या, " *दिनांक १८ जून, २०२२ त्याचा १६४ वा बलिदान दिवस आहे यानिमित्ताने किल्ल्याची भेट देऊन स्मृतीशिल्पास वंदन केले. आज माँ जिजाऊचा स्मृती दिन माँ जिजाऊ साहेब, अहिल्याबाई होळकर आणि झाशी राणीबाई यांनी सती न जाता एक गौरवशाली परंपरा राबून राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. 

झाशी या ठिकाणी जवळपास ३०० वर्षे जुने असलेले गणेश मंदिर आहे. या मंदिराची संपूर्ण व्यवस्था इथले स्थानिक मराठी मंडळाच्या वतीने होत आहे. ही अत्यंत समधानाची बाब आहे. या ठिकाणी आज आम्हाला आमंत्रित करून पूजेसाठी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले आहे. *या ठिकाणी असलेल्या वस्तू संग्रहालयात झाशी राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगलजी  पांडे, त्यांच्या राज्याचा ध्वज अशा अनेकविध बाबी आम्हाला पाहायला मिळाल्या. या ठिकाणच्या मराठी बांधवांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धवजी ठाकरे, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री ना. श्री. आदित्याजी ठाकरे यांची भेट व्हावी. झांशी, लखनौ, कानपूर, वाराणसी या भागात असलेल्या असंख्य मराठी बांधवांचे सशक्तीकरण, एकत्रीकरण आणि समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य मिळावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे.*

आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने झाशी किल्ल्यावरील व महाराष्ट्र गणेश मंदिर येथील श्री गणेशांचे झालेले दर्शन अतिशय पवित्र असून या निमित्ताने या भागात मराठी सैन्याचा, शिव छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, बाजीराव पेशवे यांनी गाजवलेला इतिहास आज आमच्या मनात जागृत झाला आहे. हा इतिहास नव्या तरुण पिढी पर्यंत पोचविण्याचा संकल्प आज मी जाहीर करीत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून या विषयी अधिकाधिक प्रभावी काम व्हावे अशी आज मी देवाकडे प्रार्थना केली आहे."

यावेळी महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटीच्या सदस्यांनी भेट घेतली. महाराष्ट्रातील नागरिकांना पुढील काळात जोडून घेण्यासाठी काम केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटी सचिव गजानन खानवलकर, उज्जवल देवधर, राहुल खांडेश्वर, संजय तळवळकर, मिलिंद देसाई, मीना खंडकर, आरती अभ्यंकर उपस्थित होत्या.  

तसेच *झांशी दौऱ्यावर असताना डॉ.गोऱ्हे यांनी आचार्य रघुनाथ धुळेंकर ऊप्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यांच्या स्नुषा व ईतिहास संशोधक डॉ.लता धुळेंकर ह्या डॉ.गोऱ्हे यांच्या आत्या असून यावेळी सदिच्छा भेट घेतली. यादरम्यान डॉ.धुळेकर यांनी बुंदेलखंड पन्ना राज्य व मराठ्यांचे संबंध यांच्यावर डॅाक्टरेट केली आहे याबाबतची माहिती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी घेतली.*Post a Comment

Previous Post Next Post