जाहीर आवाहन : रमाई घरकुल आवास योजना (शहरी) मेळावाप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी रमाई आवास घरकुल (शहरी) योजना राबविण्यात येते. याकरिता या घटकातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना / कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा या हेतूने एकाच ठिकाणी अर्ज भरून घेणे व अर्जाची छाननी करणे या कामासाठी इचलकंरंजी नगर परिषदेकडून उद्या बुधवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६.१५ या वेळेत विशेष कॅम्प आयोजित करण्यात आलेला असून वरील घटकातील नागरिकांनी/  कुटुंबांनी घरकुल योजनेचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ.  प्रदीप ठेंगल यांचेकडून करण्यात येत आहे.

 यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) रेशन कार्ड 

२)मतदान ओळखपत्र / आधार कार्ड 

३)जागा मालकीबाबत ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड (लगतचे तीन महिन्यापूर्वीचे कालावधीतील)

४) जातीचा दाखला ५)वार्षिक उत्पन्नाचा दाखला (रु. ३ लाखापर्यंत)

६) सक्षम अधिकारी यांचेकडील रहिवासी दाखला (१५ वर्षे वास्तव्य असले बाबत) ७) घरफाळा भरलेली पावती झेरॉक्स प्रत.


 ठिकाण:- राजीव गांधी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी.


  

Post a Comment

Previous Post Next Post