संगमनगर मध्ये माऊली महिला वृध्दाश्रमचा शुभारंभ


प्रेस मीडिया लाईव्ह :

तारदाळ संगमनगर येथे अवनी फौंडेशनच्या वतीने माऊली महिला वृध्दाश्रमचा शुभारंभ करण्यात आला.हा कार्यक्रम शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत पाटील ,तारदाळचे सरपंच यशवंत वाणी यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

समाजातील गरीब , निराधार वृद्ध महिलांना मायेचा आधार देत त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारण्यासाठी अवनी फौंडेशनने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माऊली महिला वृध्दाश्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार तारदाळ संगमनगर येथे या वृध्दाश्रमचा शुभारंभ तारदाळचे सरपंच यशवंत वाणी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांनी दहावी वर्गातील मिञांनी एकञित येवून महिला भगिनींच्या सोबतीने महिलांसाठी वृध्दाश्रम सुरु करुन समाजासमोर सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिल्याचे गौरवोद्गार काढले.तसेच या पवित्र कार्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य राहिल ,अशी ग्वाही दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजीत आनुसे ,भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष अशोक चौगुले ,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे ,सुधाकर कदम ,मनसे महिला आघाडीच्या सिंधुताई शिंदे ,सुवर्णा पाटील ,शशिकांत ढोणे यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदार कोळेकर ,दत्ता सोनवणे ,आनंदा गवाडी ,उत्तम वरुटे ,अमोल कदम ,संजय महाडिक  यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post