इचलकरंजीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी थाळी वाजवा आंदोलन

कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाचे अधिका-यांना निवेदन सादर.

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यासह वेतन मिळावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मलाबादे चौकातील छञपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये थाळी वाजवा जागृती आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.दरम्यान , शिष्टमंडळाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात अधिका-यांना मागणीचे निवेदन सादर केले.

कोवळ्या मनावर चांगले संस्कार करतानाच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतात.पण ,या कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळत आहे.याशिवाय महागाई भत्यासह वेतन मिळत नसल्याने विविध आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी देण्याचा निर्णय देवूनही अंमलबजावणी होत नाही. याच अनुषंगाने इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यासह वेतन मिळावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मलाबादे चौकातील छञपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये थाळी वाजवा जागृती आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.दरम्यान , शिष्टमंडळाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात सुपरवायझर अनिता रजपूत यांच्याकडे मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी सुपरवायझर मेनका माने ,शारदा जाधव उपस्थित होत्या.सदर निवेदनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महागाई.



भत्यासह वेतन मिळावे , ग्रॅच्युइटी मिळावी , निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक मानधन रक्कमेच्या निम्मी पेन्शन मिळावी , महिन्याच्या एक तारखेला मानधन खात्यावर जमा करावे ,सीबीई रक्कमेसह मोबाईल रिचार्ज व प्रवास बिले मिळावीत ,चांगले मोबाईल द्यावेत ,पोषण ट्रॅकर ॲप वापरण्याची सक्ती करु नये , कर्मचाऱ्यांना खातेबाह्य कामे लावू नयेत , थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळावा , कपात रक्कमा शासनाकडून पतसंस्थांकडे वर्ग कराव्यात आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक धोंडीबा कुंभार , सुनील बारवाडे , ज्योती हजारे , कविता कांबळे ,गंगुताई माने ,उज्वला तोडकर ,सविता बडवे ,अलका टकले , पुष्पलता शिंदे ,निलम लिपारे ,संगिता पिसे ,राजश्री चव्हाण ,उज्वला कोळी ,आरती कांबळे ,सुषमा वासुदेव , शुभांगी इंगळे ,कलावती भोसले ,प्रमिला सावंत ,रेखा माने ,दिपा   कावडे ,जयश्री सुर्यवंशी ,कल्पना कांबळे ,भाग्यश्री शिंदे , संगिता शिकलगार ,सारिका डाके ,सुरेखा कुदळे , योगिता सुतार ,मेघा आजरेकर,स्नेहा भोंगाळे

यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post