खोतवाडी हायस्कूल येथे सक्षम शाळा...सदृढ शाळा हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न



  प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : शहापूर पोलीस ठाणे व महिला दक्षता कमिटी इचलकरंजी यांच्यावतीने आज खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे कोल्हापूर पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या सक्षम शाळा व सदृढ शाळा या उपक्रमांतर्गत " वयात येताना " या विषयावर ऍड दिलशाद मुजावर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ऍड मुजावर म्हणाल्या की,किशोरवयीन मुलामुलींना या वयात एकमेकांबद्दल आकर्षण जाणवत असतं.या अकर्षणालाच ही मुलं प्रेम समजतात.या वयात प्रेम म्हणजे काय हे देखील समजत नसल्यामुळे आपला एक निर्णय आपले आयुष्य उध्वस्त करू शकतो याची जाणीव देखील यांना नसते.प्रेम आणि आकर्षण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.मुलांनी समजून घ्यायला हवं की आपल्या चुकीचा वर्तनामुळे पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्याला आपल्याला सामोरे जायला भाग पडते.

  त्यामळे किशोरवयीन मुलामुलींना वेळीच नको असलेला स्पर्श ओळखायला शिका.अशा लोकांपासून सावध रहा व विरोध करा.मोबाईल चा वापर योग्यरित्या करा.टी वि व मोबाईल पासून दूर रहा. अभ्यास करा. मेहनत करा, खूप मोठे व्हा आणि आई वडील,शाळा व गावाचा नाव लौकिक वाढवा असे प्रतिपादन केले.

  यावेळी सहायक पोलिस निरीक्षक श्री अभिजित पाटील यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की,जिल्हा पोलीस प्रमुख मा श्री डॉ शैलेश बलकवडे साहेब यांचे संकल्पनेतून "सक्षम शाळा... सदृढ शाळा" हा उपक्रम राबवित आहोत.

  कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज मध्ये भेट देऊन नवीन वर्षात येणाऱ्या सर्व प्रशालेतील विध्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षक,पालक व विध्यार्थी यांचेत योग्य समन्वय व निखळ संवाद साधण्याचे काम हे पोलीस प्रशासनाच्या वतीने केले जाईल.

  यामध्ये आपल्या सर्वांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य मार्गदर्शन केले जाईल.तसेच विद्यार्थ्यांना सायबर व बालगुन्हेगार विषयक माहिती दिली जाईल.मोबाईल चा अतिरेक वापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवाहन केले जाईल.त्याचबरोबर आईवडील व शिक्षक यांचे आज्ञेत राहून चांगल्या वाईट गोष्टींची माहिती घेण्याबरोबरच समाजातील अपप्रवृत्ती पासून सावध रहायला शिकवले जाईल असे सांगितले.

   याप्रसंगी महिला दक्षता कमिटीच्या सदस्या श्रीमती नंदाताई साळुंखे,निर्मला मोरे,वैशाली पवार,मेघा खोत,गजानन शिरगांवे (सामाजिक कार्यकर्ते) प्रशालेचे शिक्षक दत्तवाडे,मगदूम,समाजे,हेमगिरे,चौगुले,रजपूत,शिकलगार, कांबळे सर  तर शिक्षिका पाटील,घुबडे,धारवट,नेजकर मॅडम तसेच विध्यार्थी व विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

       यावेळी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक यासिन मुजावर सर यांनी केले तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पा यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post