राजकारणा ऐवजी, कटकारस्थान धमक्या यांचं गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे.

राजकारणात लोकांच्या प्रेमाला आणि विश्वासाला फारसं स्थान नाही  


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

भाजपची सत्ता गेल्यानंतर पुन्हा ती हस्तगत करण्यासाठी सर्व ते प्रकार आजमावून गमावलेली सत्ता मिळवण्याचा प्रकार गेली काही वर्षांपासून  इथं सुरू होता. त्याला आता त्यांच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले आहे. राजकारण हा साधन शुचितेचा प्रांत नाही असं आपण मानतो. कारण मूळातच आपण राजकारण ही वाईट लोकांनीच करण्याची गोष्ट आहे असं समजून चालतो. त्यांत कटकारस्थानं कुरघुडी,अनीति यांनाच स्थान असतं असंही समजतो. पण त्याविरोधात आपण कधीच प्रश्न विचारत नाही. हे बदलायला हवं असं म्हटलं तरी प्रत्यक्षात तसं घडून येतं असं दिसत नाही. 

सत्ता कोणाची आहे हा प्रश्न नाही. लोक ज्यांना निवडून देतील त्यांनी सत्तेत यावं. पण त्यांच्याकडून लोकहिताच्या कामांची अपेक्षा असते. तो पक्ष आपल्या विचारांचा असो नसो, त्याला मत दिलं असो नसो. या गोष्टी एकदा निवडणूक संपल्यावर गौण ठरतात आणि सत्ताधारी पक्षानं आता जनतेला दिलेल्या वचनांची किमान अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा असते. पण तसं घडत नाही. विरोधात बसूनही कामं करता येतात, आणि सरकारवर अंकूशही ठेवता येतो. पण भाजपला मात्र विरोधात बसणं अवघड वाटत असावं. कारण ज्या पद्धतीने सत्तेत परतण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते ते बघता यांना लोकसेवेची प्रचंड उबळ आली आहे असं वाटत होतं.

सत्ता मिळवणं यात काही पाप नाही. शेवटी तो राजकारणाचा मुख्य उद्देश असतो. पण ती कोणत्या पद्धतीने मिळवली जाते हे महत्त्वाचं असतं. लोकांनी प्रेमाने विश्वासाने तुमच्या हाती सत्ता सोपवली असेल तर ती दीर्घकाळ टिकण्याचा संभव असतो. तसं झालं नसेल तर तसं होईपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं अपेक्षित असतं. पण त्याऐवजी जबरदस्तीने, मागील दाराने, सामदाम दंड भेद, यांचा उपयोग करून तुम्ही सत्ता मिळवली तर तुम्ही लोकांचं प्रेम आणि विश्वास मात्र गमावून बसण्याची शक्यता जास्त असते.

 अर्थात सध्याच्या राजकारणात लोकांच्या प्रेमाला आणि विश्वासाला फारसं स्थान नाही  राजकारणात लोकांच्या प्रेमाला आणि विश्वासाला फारसं स्थान नाही  सध्याच्या राजकारणात यांचा मागमूसही लागत नाही. शहकाट शहाच्या डोकेबाज राजकारणा ऐवजी, कटकारस्थान धमक्या यांचं गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. या मार्गाने सत्ता मिळेलही. नव्हे मिळतेच आहे, पण त्याने आपली प्रतिमा मलीन होते याची एखाद्यातरी नेत्याला बोचणी टोचणी लागत असेल का..?

Post a Comment

Previous Post Next Post