सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रेस मीडिया लाईव्ह कडून

समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस मा. श्री.प्रसाद कुलकर्णी यांना गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले 

मी प्रेस मीडिया लाईव्ह समुहचाच आहे .. प्रसाद कुलकर्णी .प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

  इचलकरंजी ता. हातकणंगले येथील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस मा श्री.प्रसाद कुलकर्णी यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रेस मीडिया लाईव्ह पुणे तर्फे त्यांचा  लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष मा.श्री दत्ता मांजरे  (तारदाळकर) यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .

 यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले मी प्रेस मीडिया लाईव्ह  समुहचाच आहे घरच्या माणसानीच सत्कार केला आहे त्याबद्दल मी प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक व समूहाचा मनःपुर्वक आभारी आहे.

 यावेळी लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, उपाध्यक्ष नागेश क्यादगी, रयतक्रांती संघटनेचे कोल्हापूर  जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, रयतक्रांती संघटनेचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश पाटील, युथ फौंडेशन इचलकरंजीचे संस्थापक अध्यक्ष सचिन जनवाडे, प्रेस मीडिया लाईव्हचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी  मनु फरास, प्रेस मीडिया लाईव्हचे हातकणंगले तालुका प्रतिनिधी श्रीकांत कांबळे, संभाजी हत्तीकर ,मुसाफ खलीफ, महावीर चौगुले, प्रशांत कांबळे, विजय कोराणे.इ.मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post