गडमुडशींगी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व ओम हॉस्पिटल याचे वतीने मोफत नेत्र तपासणी संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

गडमुडशींगी ता.करवीर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) युवक आघाडीच्या वतीने  डाँ बाबासाहेब  आंबेडकर सास्कृतीक हाँल येथे रिपब्लिकन पक्षाचे युवा जिल्हाअध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या पुढाकाराने व ओम हाँस्पिटल यांच्या मार्फत मोतीबिंदू, काचबिदू, डोळ्याचे मास,लासरू,बुबुळ तपासणी अशा बर्‍याच नेत्र तपासण्या मोफत  करण्यात आल्या तसेच शुगर,बिपी,एच.आय.व्ही अशा विविध  रक्ताच्या ही टेस्ट मोफत करण्यात आल्या.                                                                   

या वेळी   गडमुडशींगी , वसगडे , ,चव्हाणवाडी, चिचवाड, वळीवडे, गांधीनगर भागातील नागरिकांनी याचा लाभ घेतला.व ज्यांना ज्यांना चेष्मा लागला आहे.    त्यांना अविनाश शिंदे याच्या हस्ते अत्यंत अल्प दरात चष्मे देण्यात आले.

          यावेळी डाँ भारत कांंबळे,डाँ योगी डांगे,प्रकाश भिगांडे, अभिजीत कोगले,शशिकांत कांबळे,दयानंद कुरणे,जितेद्र कांबळे,अमित कुरणे,अभिमन्यु कोगले,उत्तम कांबळे,विनायक कांबळे,अमर कांबळे,साहिल कांबळे,निशीकांत कांबळे,अविनाश कांबळे,राम कांबळे,शुभम कांबळे,प्रविण कांबळे.यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व संयोजक तसेच नागरिक मोठय़ा प्रमाणात  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post