घोसरवाड येथे 22 जून रोजी पत्रकाराचा सत्कार समारंभ

हातकणंगले तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ होत आहे .

प्रेस मीडिया लाईव्ह :

 घोसरवाड- येथे फडतारे परिवाराच्या वतीने बुधवारी दिनांक 22 जून रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायत हॉलमध्ये शिरोळ हातकणंगले तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ होत आहे .

       कोरोनाचे संकट काळात व महापुराच्या दरम्यान न्यायासाठी झटताना जिगरबाज लेखणी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान रुक्मिणी फडतारे यांच्या 9 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी साहेब, व दत्त चेअरमन गणपतराव पाटील दादा यांच्या हस्ते होणार आहे तरी पत्रकार बंधूंनी सदरच्या सत्कार समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमात सक्रीय सहभागी व्हावे त्या वेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप होणार आहे कार्यक्रमास डी वाय एस पी बाबुराव महामुनी ,पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस अधीक्षक विकास अडसुळ, घोसरवाडचे श्रीमंत सरकार विजितसिह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य श्री विजय भोजे ,जिल्हा परिषद सदस्य सौ प्रवीण पटेल या शिवाय सात गावचे सरपंच उपस्थित असणार आहेत.त्यावेळी ' हवीस तू आई' हे व्याख्यान होणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post