जिल्हाधिका-यांकडून खरीप पतपुरवठ्याचा आढावा

 जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी बांधवांना कर्जपुरवठ्याचा लाभ द्यावा

    -   जिल्हाधिकारी पवनीत कौर


प्रेस मीडिया लाईव्ह :

अमरावती :  खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून संथगतीने होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. पावसाला सुरूवात होत असून, अधिकाधिक गरजू शेतकरी बांधवांना कर्ज मिळण्यासाठी कर्जवितरणाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी  दिले.

 

    जिल्हाधिका-यांनी महसूलभवनात बँकर्सची बैठक घेऊन खरीप पतपुरवठ्याचा आढावा घेतला. जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

    यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कर्जपुरवठ्याचे 1 हजार 400 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 833 कोटींहून अधिक रकमेची कर्जप्रकरणे मंजूर असून, संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाला गती द्यावी. कुठेही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत असतील तर त्यावर तत्काळ तोडगा काढावा तथापि, कुठल्याही परिस्थितीत कर्जवितरणाची प्रक्रिया मंदावता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

    मान्सून लक्षात घेता  या कामात तत्काळ सुधारणा करावी. पुढील आठवड्यात पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.  


Collector Office Amravati -जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

Post a Comment

Previous Post Next Post