ब्रेकिंग न्यूज : अलिबाग हादरले ! दोन चिमुकल्यांची हत्या करत 2 पर्यटकांची गळफास घेऊन आत्महत्या

 



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आजकाल फिरण्यासाठी अलिबागला जास्त पसंती दिली जाते. अशाच अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पुरुषाने सोबत असलेल्या महिलेला व दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग शहरातील ए. बी. कॉटेजमध्ये हा प्रकार घडला आहे.

दोघेही कळंबोली येथील रहिवासी असून 11 मे पासून अलिबागमध्ये फिरण्याकरीत आले होते. १६ मे रोजी सकाळ पासून त्यांच्या रूमचा दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेड वर तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आले.

याप्रकरणी अलिबाग पोलिसांना कळवताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे.

दरम्यान यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी कलंबोळी पोलिस ठाण्यात नोंदविली होती.

Post a Comment

Previous Post Next Post