इचलकरंजीत शिवाजीनगर पोलीस पथकाने चोरीचे गुन्हे आणले उघडकीस

 दोघे संशयित आरोपी अटक ; ८२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत.

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे विविध चोरी प्रकरणातील संशयित आरोपी उदय माने व सुनील पांडव या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली.पोलिसांना चौकशी दरम्यान त्यांच्याकडून मोबाईल व सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल व मोटारसायकल असा सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे किंमती मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.याच दरम्यान ,गुरुचिञमंदिर या परिसरात देखील एका इसमाचा मोबाईल फोन चोरीस गेल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने चोरट्यांचा शोध सुरु केला होता.याच दरम्यान तपास पथकास एक इसम चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल फोन एका दुकानात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खब-यामार्फत मिळाली होती.त्यामुळे तपास पथकाने सापळा रचून चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येणा-या संशयित आरोपी उदय श्रीकांत माने याला ताब्यात घेवून अटक केली.पोलिसांनी

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने विविध चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.त्यानुसार त्याच्याकडून दोन चोरीचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.तसेच आणखी एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी सुनील अशोक पांडव याला ताब्यात घेवून अटक केली.तसेच त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.या दोन्ही चोरट्यांकडून सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे , अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड , उप विभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस नाईक सागर चौगले, पोलीस अंमलदार सतिश कुंभार, विजय माळवदे, पवन गुरव, सुनिल बाईत, अरविंद माने, गजानन बरगाले, प्रविण कांबळे, अमित कांबळे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post