शेतकऱ्यांना बियाणे, खते तसेच कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

 आंबेगाव तालुक्यातील विविध योजनांचा आढावा..


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दि.22: येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.

   घोडेगांव येथील आंबेगांव पंचायत समिती कार्यालयात गृहमंत्री वळसे पाटील यांच्या  उपस्थितीत  शनिवारी सायंकाळी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभाग व ग्रामपंचायतींच्या प्रशासकिय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे ,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, समाज कल्याण समितीचे माजी सभापती सुभाष मोरमारे,  घोडेगांवच्या सरपंच क्रांतीताई  गाढवे आदी उपस्थित होते.

    ग्रहमंत्री वळसे पाटील म्हणाले, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणारे बियाणे चांगल्या दर्जाचे असावे. शेतकऱ्यांच्या  मागणी नुसार खते,बियाणे व इतर निविष्ठा वेळेत मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी. आदिवासी भागातील पाणी टंचाई असलेल्या गावात पाण्याचे टॅंकर सुरुच ठेवावेत. पंचायत समिती मधील बांधकाम,शिक्षण,आरोग्य अशा विविध विभागामधील रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले. 

रोजगार हमी योजना, रमाई आवास योजनेचाही आढावा घेण्यात आला. तसेच घरकुल योजनांचाही आढावा घेण्यात आला.  संजय गांधी निराधार योजना गरजूंपर्यंत पोहोचवावी व लवकरच संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरीय समिती तयार करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.२०२१-२२ च्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाई वाटपाबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, घोडेगांव ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक नंदु वनवे, महावितरणचे  उपकार्यकारी अभियंता अनिल गिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश पटाडे, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने

Post a Comment

Previous Post Next Post