राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे लोहगाव विमानतळावर स्वागतप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि.26: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राष्ट्रपती महोदयांच्या  समवेत त्यांच्या  पत्नी सविता कोविंद होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले.

यावेळी  वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी,  पी.पी.मल्होत्रा, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनीही राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.Post a Comment

Previous Post Next Post