विशेष वृत्त : अखेर पुणे महानगरपालिका प्रशासन आम आदमी पार्टीच्या जल हक्क आंदोलनासमोर नमले


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे :   गेले  वर्षभरापासून आम आदमी पार्टी AAP PMC जल हक्क आंदोलन समिती पुणे, हे पुणे महानगरपालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून पुणे शहर आणि महानगरपालिकेच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न उपस्थित करत होते, अखेर AAP PMC जल हक्क आंदोलन समितीने महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांना पाण्याच्या गंभीर प्रश्नाचे अनेक निवेदने दिल्यानंतर आणि 24 एप्रिल 2022 रोजी AAP PMC जल हक्क आंदोलन छेडल्या नंतर प्रशासनाने ‘’आम्ही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांना नळाने पाणीपुरवठा करू “असे मान्य केले’’ आणि यापूर्वी PMC प्रशासन बांधकाम व्यवसायीकाकडून जे पाण्याचे अंडरटेकिंग घेत होते ते चुकीचे आहे, असे  सांगून नागरिकांना पाणीपुरवठा  करण्याची आपली जबाबदारी झटकत होते. 

आता पुणे महानगरपालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांनी  भविष्यात अशा कुठल्याही प्रकारचे अंडरटेकिंग घेणार नाही असे सांगितले आहे आणि येत्या 30 जून पासून महापालिकेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांना नळाने पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले आहे. परंतु  बाणेर, बालेवाडी सारखी गावे 25 वर्षापूर्वी महानगर पालिकेत् समाविष्ट होवुन अजूनही या गावांचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मग आता दिले गेलेले आयुक्तांचे हे आश्वासन कितपत खरे ठरेल हे नळाने प्रत्यक्ष पाणी सुरू झाल्यानंतरच सांगता येईल. जोपर्यंत प्रशासन महानगरपालिका हद्दीतील सर्व समाविष्ट गावे आणि सोसायट्यांना पाणी देणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी पुणे शहर या पाणी प्रश्नाचा गांभीर्याने पाठपुरावा करत राहील. असे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष श्री विजय कुंभार आणि AAP PMC जल हक्क आंदोलन समितीचे समन्वयक श्री सुदर्शन जगदाळे आणि आबासाहेब कांबळे यांनी सांगितले.Post a Comment

Previous Post Next Post