क्राईम न्यूज : पुणे शहरात युनिट ५ पोलिसांची जबरदस्त कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त..

  गुन्हेगार अटकेत , गुन्हेगार टोळ्यांचे धाबे दणाणले....


प्रेस मीडिया लाईव्ह 

अन्वरअली शेख

पुणे : शहरात सद्या वाहन चोरी आणि चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे पोलिसांनी नायनाट करण्यासाठी धावपळ सुरू केली असल्यामुळे गुन्हे गारांचे धाबे दणाणले आहेत.

फुरसुंगी परिसरात एकाच रात्री सलग तीन दुकाने फोडून चोरी झाल्याने वरिष्ठांनी युनिट ५ गुन्हे शाखा यांना सदर गुन्हयाचा तपास करुन आरोपींचा कसोशिने शोध घेवुन आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते . मा . वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे युनिट ५ कडील स्टाफ यांनी फुरसुंगी येथील दुकाने फोडुन घरफोडी झाले ठिकाणचे व आजुबाजूचे परिसरातील साधारण १५ कि.मी. अंतरावरील सी . सी . टि . व्ही . फुटेजची पाहणी करीत असताना युनिट -५ , गुन्हे शाखाकडील पोलीस अंमलदार यांना त्यांचे खास बातमीदारांमार्फतीने बातमी मिळाल्यावरुन सापळा लाऊन इसम नामे अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी , वय -२० वर्षे , रा.स.नं. भापकर वस्ती , पाण्याचा टाकीजवळ , मांजरी बुद्रुक , पुणे यास चोरीची गाडी व त्यामधील घरफोडीचे हत्यारासह शिताफीने पाठलाग करुन पकडले . त्याचेकडे विश्वासात घेऊन तपास करता मौजमज्जासाठी पैसे लागत असल्याने त्याने व त्याचे साथीदारासह लोणी काळभोर येथुन मारुती इक्को कार चोरी केली . तीचा वापर करुन कोंढवा हडपसर , लोणी काळभोर , यवत अशा ठिकाणी घरफोडीचे व वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन एक मारुती इक्को कार , अॅक्टीव्हा , सोन्या - चांदीचे दागिने असा एकुण ६,४२,५०० / -रु.कि.चा मुद्देमाल जप्त करुन एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले आहे . उघडकीस आलेले गुन्हे - १ ) हडपसर पो.स्टे . गुन्हा रजि . नं . ५१२/२०२२ मा.दं.वि.क. ४५७ , ३८० , ५११४२७ , ४२७ हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. २६० / २०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० २ ) 3 ) 8 ) कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि . नं . ४२३ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५७ , ५११३८० यवत पोलीस स्टेशन गु.र.नं .३८१ / २०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८० लोणीकाळमारे पो.स्टे . गुन्हा रजि . नं . २३७/२०२२ भादंवि क . ३७ ९ हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ कोढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०८/२०२२ भा.द.वि. कलम ३७ ९ ६ ) ( 19 ) सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त , श्री . संदीप कर्णिक मा अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री . रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त श्री . श्रीनिवास घाडगे , मा . सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , पुणे , श्री . नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , हेमंत पाटील , सहायक पोलीस निरीक्षक , कृष्णा बाबर , पोलीस अमंलदार , विनोद शिवले , अकबर शेख , प्रमोद टिळेकर , रमेश साबळे , दया शेगर , दाऊद सय्यद , प्रविण काळभोर , आश्रुवा मोराळे , चेतन चव्हाण , स्वाती गावडे यांनी केली आहे .


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख 

Post a Comment

Previous Post Next Post