पुणे जिल्ह्यातील धरणात बुडालेल्या व्यक्तींची घटना दुर्दैवी : डॉ. नीलम गोऱ्हे

मदत आणि पुनर्वसन विभागाकडे घटनेच्या सखोल चौकशीची केली मागणी ..


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, ता. २० : पुणे जिल्ह्यातील दि १८ मे २०२२ रोजी चासकमान, ता.राजगुरूनगर व भाटघर , भार धरणामध्ये मृत्यू पावलेल्या घटनेची सखोल माहिती घेऊन चौकशी करणे बाबत सूचना आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज केली आहे. 

ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे आज त्यांनी नमूद केले आहे. याबाबत असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव,मदत व पुनर्वसन विभाग यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

आपल्या पत्रात त्यांनी पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत  

पुणे जिल्ह्यामध्ये दि १८ मे २०२२ रोजी चासकमान व भाटघर या ठिकाणी दोन महत्त्वाच्या घटनांमध्ये जवळपास नऊ व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुले ,दोन मुली व पाच महिला आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. 

या दोन्ही घटनांमध्ये सर्वजण पोहण्यासाठी गेले होते. तथापी   पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे सर्वजण बुडाले आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांची खालील बाबींचा विचार करून सविस्तर चौकशी करावी.

*१) या तलावांमध्ये या स्वरूपाच्या घटना पुर्वीही झाल्या आहेत. त्या परत घडु नयेत यासाठी काय कार्यवाही केली आहे त्याची चौकशी करण्यात यावी. 

*२)हे तलाव पोहण्यासाठी धोकादायक आहेत याबाबत बोर्ड लावणे आवश्यक आहे.

*३) ही दोन्ही धरणे ही मोठी आहेत व याठिकाणी पाणी साठा ही अधिक असेल  अशावेळी या ठिकाणी रेस्क्यू साठी बोट व इतर साहित्य असावे. 

*४) या ठिकाणी नागरिकांनी पोहायला प्रतिबंध करण्यासाठी जलसंधारण विभागाचे कर्मचारी व नेमले जावेत *  

*५) सदर महिलांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे देण्याकरिता कार्यवाही व्हावी.  

  या घटनांची वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तरपणे चौकशी करावी. तसेच या नंतर पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत व तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत खालील उपाय योजना कराव्यात. 

*१) ज्या ठिकाणी नागरिक पाण्यात उतरू शकतात अशा ठिकाणी सुरक्षिततेसाठी भिंत किंवा लोखंडी रॉड बांधण्यात यावे.*

*२)  राज्यात धरणांच्या किनाऱ्यांवर  लाईफ जॅकेट, स्पीड बोट,दोरी व इतर साहित्य उपलब्ध असावे. *

*४) या धरणाच्या विविध ठिकाणी  पोहण्यासाठी धोकादायक जागा असे सूचनाफलक असावेत. *  

*५) धरणांच्या ठिकाणी ज्याला उत्तम पोहता यावे अशी एक स्वतंत्र व्यक्ती येणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणार्थ नेमावा.*



Post a Comment

Previous Post Next Post