लॉकडाऊनच्या काळात व अजूनही पुणेकरांचे सहकार्य उत्तम लाभले आहे व या पुढे सुद्धा सहकार्य राहू दे...पोलिस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता

 पुणे पोलिस आयुक्तालय तर्फे रोजा इफ्तारचा कार्यक्रम संपन्न ..

कायदा व्यवस्था व शहरात शांतता राहण्यासाठी पोलीस सतत धडपडत असतात .. पी. ए. इनामदार.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : आझम कॅम्पस  येथे  पुणे पोलिस आयुक्तालय तर्फे पुणे शहरातील नागरिक आणि मुस्लिम बांधवांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अगदी आनंदमय वातावरणात एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत भव्य अशी इफतार पार्टी संपन्न झाली .



या वेळी पुणे पोलिस आयुक्त  श्री अमिताभ गुप्ता  म्हणाले की , लॉकडाऊनच्या  काळात व अजूनही  पुणेकरांचे सहकार्य उत्तम लाभले आहे  व या पुढे सुद्धा सहकार्य राहू दे . तर अवामी महाजचे अध्यक्ष श्री पि ए इनामदार म्हणाले की कायदा सुव्यवस्था व शहरात शांतता राहण्यासाठी पोलीस सतत धडपडत असतात त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते . तर हडपसर  विधानसभेचे आमदार चेतन तुपे यांनी सर्वानाच रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. 



या  कार्यक्रमास  आमदार सुनील कांबळे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे,अमिताभ गुप्ता पोलिस आयुक्त पुणे शहर, डॉ.पी.ए.इनामदार प्रमुख आझम कॅम्पस, मो. गौस शेर अहमद उर्फ बबलू सय्यद (संचालक मुस्लिम बँक पुणे ) ,   माजी आमदार रमेश बागवे अध्यक्ष काँग्रेस पक्ष पुणे शहर, माजी आमदार मोहन जोशी,आमदार चेतन तुपे आदी मान्यवर पाहुणे मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनी अति उत्साहात प्रतीसात दिले,या कार्यक्रमाचे निमंत्रक अमिताभ गुप्ता पोलिस आयुक्त पुणे शहर,संदिम कर्णिक सह पोलिस आयुक्त पुणे शहर,राजेंद्र डाहाळे अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक  विभाग, आदी मान्यवर पाहुणे मंडळी उपस्थित होते

2 Comments

Previous Post Next Post