कुलगुरूंनी दिलेली आश्वासने कोण पूर्ण करणार.....?



प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू  येत्या चार- पाच दिवसांमध्ये सेवानिवृत्त होत आहेत .यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये समाजाला जी आश्वासने दिली आहेत, ती कोण पूर्ण करणार ? अशी चर्चा होत आहे. मार्च २०२०  मध्ये दोहा (कतार) येथील प्रशासकीय यंत्रणेशी शैक्षणिक करार केला होता. मराठी भाषेचा प्रसार जागतिक स्तरावर व्हावा अशी याची संकल्पना होती.तसेच कश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यानंतर ऑक्टोबर २०२१  मध्ये लडाख येथे सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठाचे संशोधन केंद्र स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी लडाख येथील खासदार जामरांग  त्सेरिंग यांच्याशी बैठक झाली होती. 

यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याची समिती देखील नेमली गेली होती. परंतु त्यावर अद्याप प्रश्नचिन्हच आहे. कुलगुरू महोदयांनी जनतेला दिलेल्या  या आश्‍वासनांचे पुढे काय ? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. शिक्षण, उच्च शिक्षण ,संशोधन हे विद्यापीठाचं मूलभूत कार्य आहे. यामुळे समाज निर्मिती होते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. वर्ष २०१७-१८  मध्ये परीक्षा विभागातील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी एक चौकशी समिती नेमली होती, या चौकशी समितीस परीक्षा विभागाच्या कामकाजाची आढावा घेण्याची व नवीन उपाय योजना, सुधारणा करण्याची जबाबदारी दिली होती. परंतु ह्या समितीचे पुढे काय झाले ? या अनुषंगाने गेल्या पाच वर्षातील कुलगुरूंनी दिलेल्या वेगवेगळ्या आश्वासनांची पूर्तता कोण करणार? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post