४१ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक

महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई..

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दि.२५: महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने जवळपास ४१ कोटीच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाची ७ कोटी ३८ लक्ष रुपयांच्या कर महसूलाची हानी करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक केली आहे.

में जिरावाला मेटल्स या व्यापाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवा कर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहीमे अंतर्गत प्रवीण भबूतमल गुंदेचा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली आहे. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या  व्यापाऱ्यांचा  कसून शोध घेत आहे. विभागाकडून या आर्थिक वर्षात आतापर्यंत दहा कारवाया करण्यात आल्या आहेत.

अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे,राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त दत्तात्रय व आंबेराव, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर सहाय्यक आयुक्त सतीश दगडु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post