गंगामाई गर्ल्स‌‌‌ हायस्कूलमध्ये मदनलाल बोहरा - सौ.गीताबाई बोहरा यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम साजरा

 शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूल व  ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वर्गीय मदनलाल बोहरा व स्वर्गीय सौ.गीताबाई बोहरा यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  मोफत उन्हाळी शिबारात घेण्यात आलेल्या  योगासन, लाठीकाठी,  तायक्वांदो ,कराटे , मातकाम, नृत्य  ,क्राफ्ट ,अभिनय अशा विविध उपक्रमातील  यशस्वी विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर ,ना.बा.एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी येथील उद्योगपती , दानशूर व्यक्तीमत्व म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या स्व.मदनलाल बोहरा यांनी उद्योग ,व्यवसायाबरोबरच शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ना.बा.एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून सक्षम विद्यार्थी घडावेत , यासाठी आग्रही भूमिका घेत त्यांनी दिलेले योगदान इचलकरंजी शहराच्या विकासात मोठे योगदान देणारे ठरले आहे.त्याचबरोबरच वस्ञोद्योगाशी निगडीत उद्योग - व्यवसायातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.म्हणूनच त्यांना कर्मयोगी म्हणून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेतली जाते.नुकताच श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व  ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वर्गीय मदनलाल बोहरा व त्यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय सौ.गीताबाई बोहरा यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यानंतर प्रशालेच्या 53 व्या सुकन्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच मोफत उन्हाळी शिबारात घेण्यात आलेल्या  योगासन, लाठीकाठी,  तायक्वांदो ,कराटे , मातकाम, नृत्य  ,क्राफ्ट ,अभिनय यासह विविध उपक्रमांमध्ये यशस्वी विद्यार्थिनींना बक्षिसे देण्यात आली. 

यावेळी आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी इचलकरंजी मधील ना. बा. शिक्षण संस्थेच्या विकासात व विस्तारात स्वर्गीय मदनलाल बोहरा शेठजी यांचे योगदान महत्वाचे आहे.आपला उद्योग, व्यापार, व्यवसाय सांभाळून त्यांनी इचलकरंजीमध्ये शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे. इचलकरंजीमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या कापड उद्योगातील सर्वसामान्य कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले .श्रीमानशेठ मदनलाल बोहरा यांचा वारसा विचार व काम पुढे नेण्यासाठी त्यांचे वारस संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा व चेअरमन हरिष बोहरा हे काम करीत आहेत. ना. बा. शिक्षण संस्थेच्या विस्तारात बोहरा कुटूंबियांचे योगदान महत्वाचे असल्याचे गौरवोद्गार काढले.

यावेळी कार्यक्रमाचे  स्वागत, प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याधापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी श्रीमान शेठ मदनलालजी बोहरा हे, ना. बा. शिक्षण संस्था परिवाराचे आधारवड होते. त्यांच्या प्रयत्नाने संस्थेचा विस्तार झाला.जिद्द चिकाटी, प्रयत्न या 'त्री'सूत्रीने शेठजींनी भरीव काम केले. दिलेला शब्द पाळण्यासाठी शेठजी वचनबद्ध असत , असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी शेठजींवर स्वरचित काव्यवाचनही केले.

 यावेळी संस्थेचे ऑनररी सेक्रटरी बाबासाहेब वडिंगे , उप पप्राचार्य  आर. एस. पाटील ,उपमुख्याधापिका सौ. एस. एस. भस्मे, सौ. एस. जे. कुलकर्णी, सौ. व्ही. डी. रावळ ,क्रीडा शिक्षक  शेखर शहा यांनीही मनोगत  व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा होते.त्यांनी शेठजींच्या आठवणींना उजाळा देताना गहिवरुन आले. 

यावेळी  व्हा. चेअरमन उदय लोखंडे,ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, ऑनररी सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे ,स्कूल कमिटी चेअरमन  मारुतराव निमनकर, विश्वस्त लक्ष्मीकांत पटेल, विश्वस्त महेश बांदवलकर, रामकिशोर तिवारी. , उपप्राचार्य  आर. एस. पाटील, उपमुख्याधापिका सौ. एस. एस. भस्मे, पर्यवेक्षक  व्ही. एन. कांबळे उपस्थित होते.

 यावेळी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त  मोफत उन्हाळी शिबारात घेण्यात आलेल्या  योगासन, लाठीकाठी,  तायक्वांदो ,कराटे , मातकाम, नृत्य  ,क्राफ्ट ,अभिनय इ.विविध उपक्रमांचे  यशस्वी विद्यार्थिनींना बक्षिसे देण्यात आली.  क्रीडाशिक्षक   शेखर शहा यांनी पुढील वर्षाच्या शिबिरासाठी  रोख रकमेचा निधी जाहीर केला. या कार्यक्रमासाठी शिक्षक,  विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post