क्रांती समूहाचे काम कौतुकास्पद... आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोथळी : 

  कोथळी सारख्या ग्रामीण भागात क्रांती समूहाने वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून उभे केलेले काम कौतुकास्पद आहे असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले,क्रांती ग्रामीण नागरी सह. पतसंस्था मोठ्या कष्टाने व जिद्दीने उभी राहिली आहे. 20 वर्षापूर्वी लहानसे रोपटे असणारी ही संस्था खडतर परिस्थितीतून  प्रामाणिक व कसोटीने सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा विश्वास संपादन करून आज उभी राहिली आहे, त्यामुळेच संस्थेच्या स्वमालकीच्या जागेवर इमारत उभी राहत असल्याचे मत नाम. डॉ. राजेंद्र पाटील  यड्रावकर यांनी नूतन वास्तु बांधकाम पायाखुदाई दरम्यान बोलताना व्यक्त केले. 


ते पुढे बोलताना म्हणाले की, जिद्द आणि चिकाटीने काम केल्यास कोणतीही सहकारी संस्था तोट्यात येत नाही.माझ्याकडून यापुढील काळातही क्रांती समूहाला  लागेल ती मदत राहील, तालुक्यातील इतर संस्थांनी सुद्धा सहकारातील चांगल्या संस्थांचा आदर्श घेऊन आपल्या स्वमालकीच्या जागेत इमारती उभाराव्यात व मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्राचे जाळे विस्तारित करावे असे मत यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन देवगोंडा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत शिरोळ तालुका सहकारी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे यांनी केले.आजच्या कोथळी भेटी दरम्यान राज्यमंत्री यड्रावकर यांनी श्री. बसवेश्वर जयंतीनिमित्त कल्लेश्वर मंदिरा मध्ये दर्शन घेऊन श्री.कलेश्वर मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली,क्रांती पतसंस्थेच्या नियोजित जागेवरील बोअरचे पूजन व्हा. चेअरमन दिलीप मगदूम यांच्या हस्ते झाले.यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन धनगोंडा पाटील, माजी पंचायत उपसभापती राजगोंडा पाटील, कुमार बोरगावे, बाबुराव पाटील, सरपंच वृषभ पाटील, रावसो विभुते, आण्णासो आंबी, बाबासो गुरव, गणेश स्वामी, अशोक पुजारी, गोलू पाटील, शांतिनाथ मास्तर, कुमार सुतार, नवनाथ विभुते, पोपट विभुते, बाबसाब जैन,दिलीप कुंभार,नानासो पुजारी, सागर बोरगावे, व्यवस्थापक सुहास बुर्ले यासह सभासद हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.आभार संचालक राजेंद्र नांदणे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post