इचलकरंजीत भाजप दिव्यांग आघाडीचा पुरवठा कार्यालयावर मोर्चा

प्रलंबित मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा..


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी भाजप शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांच्यासमोर दिव्यांग बांधवांचे गा-हाणे मांडून त्यांना चांगलेच धारेवर धरले.तसेच याबाबत तातडीने कार्यवाही करुन दिव्यांग बांधवांना न्याय न दिल्यास तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत पाञ लाभार्थ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळत असतो.  माञ , इचलकरंजी शहरात या योजनेचा गरजू व गरीब दिव्यांगांना लाभ मिळत नसल्याचा वाईट अनुभव येत आहे.याला संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा आरोप भाजप दिव्यांग आघाडीने केला आहे.याच अनुषंगाने आज सोमवारी भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने इचलकरंजी येथील पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चेकऱ्यांनी मनमानी कारभार करुन सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.तसेच भाजपचे शहर अध्यक्ष अनिल डाळ्या ,दिव्यांग आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक लोखंडे , सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मळगे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांच्यासमोर संजय गांधी निराधार अनुदान योजना व पुरवठा कार्यालयातील संबंधित प्रलंबित कामाबाबत गा-हाणे मांडून त्यांना चांगलेच धारेवर धरले.तसेच गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विविध लाभापासून वंचित रहावे लागत आहे.याला सर्वस्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा आरोप केला.तसेच आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सादर करुन याबाबत तातडीने कार्यवाही करुन दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा ,अन्यथा तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी मोर्चा मध्ये गोडचापा हुनशाल,श्रीमती शालिनी  पाटील, जमीर शेख, शोएब आरकाटे, अशोक सातपुते, अनिता सोनकांबळे, एकनाथ शिंदे,आदी दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post