इचलकरंजीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली सरकारच्या सुटी रद्द परिपञकाची होळी

 उन्हाळी सुटी पूर्ववत करण्याची निवेदनाद्वारे मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची १० दिवसांची सुटी रद्द केल्याच्या निषेधार्थ आज मलाबादे चौकात परिपञकाची होळी करण्यात आली.यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हक्काची उन्हाळी सुटी मिळालीच पाहिजे ,अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच उन्हाळी सुटी पूर्ववत करावी ,अशा मागणीचे निवेदन एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयास देण्यात आले.  

     

    राज्यात सर्व ठिकाणी तीव्र उन्हाळ्यामुळे उष्माघाताने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्याने नागरिकांना दक्ष राहण्याचे व शक्यतो घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत.याशिवाय कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुटी रद्द करण्यात आल्या होत्या ‌‌.यावर्षी २३फेब्रुवारी रोजी अंगणवाडी कृती समितीने विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढला होता.यावेळी राज्य सरकारच्या महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या प्रधान सचिवांनी मागील बुडालेल्या सुट्या व यावर्षीच्या उन्हाळी सुट्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.असे असताना एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी अचानक परिपञक काढून उन्हाळी सुटीतील १० दिवसांची सुटी रद्द करुन ६ दिवसांची सुटी जाहीर करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्यायाची कु-हाड चालवली आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची १० दिवसांची सुटी रद्द केल्याच्या निषेधार्थ आज मलाबादे चौकात परिपञकाची होळी करण्यात आली.यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हक्काची उन्हाळी सुटी मिळालीच पाहिजे ,अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच उन्हाळी सुटी पूर्ववत करावी ,अशा मागणीचे निवेदन  महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयास देण्यात आले.यामध्ये उन्हाळी सुटी रद्दचे परिपञक तात्काळ मागे घ्यावे ,सेविका व मदतनीसांना आळीपाळीने प्रत्येकी १६ दिवस सुटी द्यावी ,मिनी अंगणवाडी सेविकांना सुटीपासून वंचित ठेवू नये , दररोज गरम ताजा आहार सुरु करावा ,उन्हाच्या बचावासाठी कर्मचा-यांना अंगणवाडीत ३ तास थांबवून न घेता फक्त आहार वाटप करुन घरी जायचे आदेश द्यावेत , उन्हामध्ये सर्व्हेक्षणाचे काम करुन घेवू नये ,यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.‌या आंदोलनात राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे संघटक धोंडिबा कुंभार ,पुष्पा शिंदे ,उज्वला तोडकर ,गंगुताई माने ,सारिका कोकणे , कविता कांबळे ,सुगंधा भुईंबर ,वंदना भाटले , वैशाली भोसले ,संगीता पिसे ,विद्या चंदूरे ,कलावती भोसले , सुरेखा कुदळे ,सारिका डाके , दिपाली पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post