इचलकरंजीत मनसेचे मंदिरासमोर सामुहिक हनुमान चालीसा पठण

  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ; नागरिकांमध्ये रंगली मोठी चर्चा

प्रेस मीडिया लाईव्ह 

इचलकरंजी /प्रतिनिधी            

 इचलकरंजी येथे मनसेच्या वतीने आज बुधवारी सोन्या मारुती मंदिरासमोर सामुहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली होती.        

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत प्रार्थनास्थळांवरील भोंगे ३ मे पर्यंत काढण्याचे आवाहन केले होते. यावेळी भोंगे न काढल्यास ४ मे पासून प्रार्थनास्थळांसमोरच कार्यकर्त्यांनी स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करावे, असे आवाहनही केले होते. यावरून संपूर्ण राज्यात वातावरण चांगलेच तापले असून साऱ्या राज्याचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. राज्यात अनेक ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले तर अनेक ठिकाणी प्रार्थनास्थळांवर भोंगे न वाजल्याने शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील सोन्या मारुती मंदिरासमोर मनसेच्यावतीने पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसाचे सामुहिक पठण करण्यात आले. 

यावेळी मनसे शहरप्रमुख प्रताप पाटील, उपजिल्हा प्रमुख रवि गोंदकर, मोहन मालवणकर, राजेंद्र निकम, सिंधुताई शिंदे, छाया कोरवी, महेश शेंडे, संग्राम पोरे, रामचंद्र बागलकोटे, संदीप पोवार, विशाल पाच्छापुरे, बाळासाहेब राजमाने, वसंत नाईक, विलास जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post