सौ.सुनिता केटकाळे आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

मुंबई येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनामध्ये इचलकरंजीतील  डीकेटीई संस्थेच्या अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता विजय केटकाळे यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार त्यांनी ऑस्ट्रेलियाचे शिक्षणतज्ञ आयलन बालगायचं यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडूयांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकारला.


इचलकरंजी येथील डीकेटीई संस्थेच्या अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता  केटकाळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातील अभ्यासाबरोबरच विविध कला ,खेळाची आवड निर्माण होण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु ठेवला आहे.यासाठी त्यांना सर्व शिक्षक - शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभत आहे.याचाच परिणाम अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा ,स्पर्धा आणि कलागुणांमध्ये वेगळेपण जपले आहे.यासाठी मुख्याध्यापिका सौ.सुनिता केटकाळे यांचे अथक परिश्रम मोलाचे ठरले आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेञातील या उल्लेखनीय कार्याची महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या वतीने दखल घेवून त्यांची आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हाॅल येथे नुकताच

घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनामध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाचे शिक्षणतज्ञ आयलन बालगायचं यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू  ,मजदूर युनियनचे सचिन आहिर, ऑस्ट्रेलियाचे शिक्षणतज्ञ आयलन बालगायचं, ऑस्ट्रेलियाच्या संचालिका जुनिता हेले, मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील यांच्यासह विविध मान्यवर व सर्व संचालक उपस्थित होते.या पुरस्काबद्दल सौ.सुनिता केटकाळे यांना डिकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ,माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, सचिव सौ.सपना आवाडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post