पंढरपूरातील राष्ट्रीय शिक्षक संमेलनात शिक्षिकांचा सत्कार

 सत्कारा मध्ये सौ.रजनी घोडके ,सौ.वैशाली काडे ,सौ.निशा सुर्यवंशी ,सौ.सुरेखा कुंभार यांचा समावेश..

प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी / प्रतिनिधी

पंढरपूर येथे ॲक्टिव टिचर्स महाराष्ट्र सामाजिक प्रतिष्ठान संस्थेमार्फत दोन दिवसीय ५ वे राष्ट्रीय शिक्षक संमेलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.यावेळी शिकू आनंदे कार्यक्रमात उत्कृष्ट सुलभक म्हणून कार्य केल्याबद्दल एससीईआरटीचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर,उपसंचालक डॉ.सौ.नेहा बेलसरे, राजस्थानचे ॲप गुरु इम्रान खान, दिल्लीच्या मेंटॉर शिक्षिका मनु गुलाटी यांच्या हस्ते इचलकरंजी शहरातीलमाई बाल विद्या मंदिरच्या सौ.रजनी घोडके , तात्यासाहेब मुसळे विद्या मंदिरच्या सौ.वैशाली काडे , बालाजी विद्या मंदिरच्या सौ.निशा सुर्यवंशी ,उदगाव कन्या विद्या मंदिरच्या सौ. सुरेखा कुंभार या शिक्षिकांचा शिल्ड व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

ॲक्टिव टिचर्स महाराष्ट्र सामाजिक प्रतिष्ठान संस्थेमार्फत विद्यार्थी , समाज व शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात.नुकतेच या संस्थेचे पंढरपूर येथे दोन दिवसीय ५ वे राष्ट्रीय शिक्षक संमेलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी नवोपक्रम व कृति संशोधन तसेच विविध शैक्षणिक विषयांवर अनेक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले.महाराष्ट्रातील शिक्षकांचे यावेळी शैक्षणिक पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. लडाखचे शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्याशी ऑनलाईन चर्चासत्रात शिक्षकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे योग्य पध्दतीने निरसन करण्यात आले.तसेच

शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची शिक्षक ते शिक्षण संचालक...आगळावेगळा प्रवास या विषयावर माहितीपूर्ण प्रगट मुलाखत घेण्यात आली.माझी शाळा माझे उपक्रम यामध्ये सौ.सुरेखा कुंभार यांनी आपल्या शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे उत्कृष्ट असे सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.

यावेळी दर शनिवारी प्रसिद्ध होणा-या शिकू आनंदे कार्यक्रमात उत्कृष्ट सुलभक म्हणून कार्य केल्याबद्दल एससीइआरटीचेशिक्षण संचालक दिनकर टेमकर,उपसंचालक डॉ.सौ.नेहा बेलसरे, राजस्थानचे ॲप गुरु इम्रान खान, दिल्लीच्या मेंटॉर शिक्षिका मनु गुलाटी यांच्या हस्ते माई बाल विद्या मंदिरच्या सौ.रजनी घोडके , तात्यासाहेब मुसळे विद्या मंदिरच्या सौ.वैशाली काडे , बालाजी विद्या मंदिरच्या सौ.निशा सुर्यवंशी ,उदगाव कन्या विद्या मंदिरच्या सौ. सुरेखा कुंभार या शिक्षिकांचा शिल्ड व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.या संमेलनात केरळचे विधू नायर ,ॲक्टिव टिचर्स महाराष्ट्रचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ ,सौ.ज्योती बेलवले यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

Post a Comment

Previous Post Next Post