कात्रज- कोंढवा रस्ता रुंदीकरण तातडीने पूर्ण करून वाहतूक कोंडी सोडवा ...आम् आदमी पार्टी पुणे शहर

 ५ कोटी रुपये निधीचा योग्य पद्धतीने वापर करा अन्यथा  रस्त्यावर उतरून नागरिकांचा आक्रोश आंदोलनातून व्यक्त  होईल; आम् आदमी पक्ष.

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख : 

पुणे दि.१९ पुणे शहरात एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे  स्मार्ट सिटी ची घोषणा , परंतु सत्य स्थिती नागरिकांसमोर वाहतूक कोंडीची उभी आहे त्यासाठी पुणेकर हा वाहतूक कोंडी मध्ये भरडला जात आहे. प्रशासनाची उदासीनता आणि रस्त्यांच्या कामांमध्ये विलंब यामुळे पुणे शहरातील नागरिक त्रस्त झालेले दिसत आहे. पुणे शहरातील आम आदमी पक्षाने कात्रज ते खडीमशीन या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची सुटका व रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दर्शवला आहे.

 

कात्रज चौक ते खडीमशीन चौक या साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 84 मीटर रुंदीकरणाचे काम 2018 साली सुरू झाले होते . सप्टेंबर 2021 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते . परंतु अद्यापही या मार्गावर कोणतीच प्रगती दिसून येत नाही . परिणामी कात्रज- कोंढवा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो . संध्याकाळच्या वेळी हे 3.5 किलोमीटरचे अंतर पार करायला पाऊन ते एक तासाचा वेळ लागतो . सकाळी व संध्याकाळी नागरिकांना या भागातून जाणे प्रचंड जिकिरीचे झाले आहे . या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघात होऊन गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल 63 लोकांना जीव गमवावा लागला आहे . याशिवाय धुळीचा भोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे . आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे सुद्धा चिंतेचा विषय बनलेली आहेत . हा रस्ता तातडीने रुंद होणे ही या भागात राहणाऱ्या नागरिकांची सर्वात मोठी गरज बनलेली आहे . महानगरपालिका प्रशासन याबाबत फारसे गांभीर्य दाखवत नाही . हा रस्ता रुंद करण्यासाठी लागणारे भूसंपादन अद्यापही झालेले नाही . या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये येत असलेली राजकीय आडकाठी हासुद्धा एक चिंतेचा विषय आहे . पण सदर रस्ता रुंद करून नागरिकांच्या समस्या सोडवणे हे महानगरपालिका प्रशासनाचे काम आहे . यातील अडथळे दूर करण्यासाठी महानगरपालिकेला अनेक धोरणात्मक बाबींचे पर्याय उपलब्ध आहेत . त्याचा वापर महानगरपालिकेने करून घेतला पाहिजे .

शेकडो कोटी रुपये खर्च करुन स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये शहराच्या अगोदरच चांगले असलेल्या रस्त्यांचे अजून सुशोभीकरण करण्याऐवजी पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कात्रज - कोंढवा सारख्या रस्त्याचा प्राधान्याने विचार प्रशासनाने केला पाहिजे . शहरातील गतिमान वाहतुकीसाठी हा निधी वापरला जायला हवा . सकाळी व संध्याकाळी प्रति ताशी १० ते १५ हजार वाहनांची वाहतूक करणाऱ्या कात्रज कोंढवा रस्ता या महत्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण तातडीने पूर्ण करून वाहतूक कोंडी सोडवा .... त्यासाठी पालिकेकडे उपलब्ध धोरणात्मक व योजनांचा कोणताही पर्याय वापरा पण रस्ता तातडीने रुंद करा अशी आपची आग्रही मागणी आहे . तसेच अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा आणि ताब्यात आलेल्या रस्त्याच्या जागांवरील अतिक्रमण हटवून डांबरीकरण करावे अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे . त्यासाठी मंजूर झालेल्या ५ कोटी रुपये निधीचा योग्य पद्धतीने वापर केला जावा . अन्यथा आम आदमी पक्षाला या बाबत रस्त्यावर उतरून नागरिकांचा आक्रोश आंदोलनातून व्यक्त करावा लागेल . कळावे , विजय कुंभार , राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष आम आदमी पक्ष यांनी पत्रका द्वारे विक्रम कुमार , आयुक्त , पुणे महानगरपालिका यांना विनंती केली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक : अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post