फसवणूक प्रकरणातील मुख्य सुञधारासह संशयित आरोपी कारवाईपासून मोकाट

विवाह जमवण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी सक्रिय ; पोलीस यंञणेने कारनाम्याचा पर्दाफाश करण्याची मागणी..


प्रेस मीडिया लाईव्ह :

कबनूर येथे सासरकडील चार तोळे सोन्याचे दागिने घेवून पोबारा करणा-या नवविवाहितेसह तिच्या साथीदारांवर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होवूनही ते अद्याप कारवाईपासून मोकाट फिरत आहेत.या प्रकरणात आजतागायत केवळ एकावर कारवाई करण्यात आली आहे . त्यामुळे उर्वरित गुन्हा दाखल झालेल्या मुख्य सुञधार महिलेसह चौघा संशयित आरोपींवर पोलिस कारवाई कधी होणार अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.दरम्यान , विवाह जमवण्याच्या बहाण्याने विविध इच्छुक युवक व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची जोरदार चर्चा आहे.त्यामुळे पोलीस यंञणेने या टोळीच्या मुळाशी जावून कारनाम्याचा पर्दाफाश करण्याची मागणी देखील नागरिकांतून होत आहे.

काही महिन्यांपूर्वी कबनूरमधील लक्ष्मीमाळ परिसरात राहणाऱ्या विनोद उत्तुरे या युवकाचे काही मध्यस्ती महिलांनी रेखा घाटगे या युवतीशी विवाह लावून दिला होता.या बदल्यात ५० हजार रुपये फी म्हणून उकळले होते.यानंतर सदर नवविवाहितेने सासरच्या मंडळींचा विश्वास संपादन केला होता.याचाच फायदा उठवत तिने माहेरी जयसिंगपुरला जावून येतो ,असे सांगून सासरच्या घरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला होता.या घटनेच्या सुरुवातीला सदर विवाहिता बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती विनोद उत्तुरे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.त्यानंतर तिचा सर्वञ शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.त्यामुळे या प्रकरणाचे गुढ आणखीनच वाढले होते.अखेर विवाहिता रेखा घाटगे हिने संगनमताने सासरच्या घरातील सोन्याचे दागिने पोबारा केल्याचे उघड झाले होते.त्यामुळे विनोद उत्तुरे यांनी नवविवाहितेने विवाह जमवणा-या मध्यस्ती महिलांच्या संगनमताने  आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यानुसार नवविवाहिता रेखा घाटगे हिच्यासह सिमा मोदानी , माधुरी चव्हाण ,शहिदा बारगीर ,फारुक बारगीर या पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याच दरम्यान , यातील काही संशयित आरोपींकडून सदर फिर्यादीस वारंवार धमकी दिली जात असल्याची चर्चा आहे ‌.

या फसवणूक प्रकरणात केवळ माधुरी चव्हाण या महिला संशयित आरोपीस ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.तर गुन्हा दाखल होवून आठ महिने उलटले तरी देखील या प्रकरणातील मुख्य सुञधार महिलेसह

चौघे संशयित आरोपी अद्याप कारवाईपासून लांब राहून मोकाट फिरत आहेत.त्यामुळे उर्वरित गुन्हा दाखल झालेल्या चौघा संशयित आरोपींवर पोलिस कारवाई कधी होणार अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.दरम्यान , विवाह इच्छुक युवकांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची जोरदार चर्चा आहे.त्यामुळे पोलीस यंञणेने या टोळीच्या मुळाशी जावून कारनाम्याचा पर्दाफाश करण्याची मागणी देखील नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post