प्रबोधिनीत राजर्षिना अभिवादनप्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी ता. ६ लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिशताब्दी निमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यासाठी समाजवादी प्रबोधिनीच्या व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने शंभर सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. प्रारंभी राजर्षींच्या प्रतिमेला किरण कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची मांडणी केली. यावेळी राजर्षी शाहू महाराजांवरील ग्रंथाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.यावेळी पांडुरंग पिसे,प्रकाश कांबळे,सौदामिनी कुलकर्णी, मनोहर जोशी,नंदा हालभावी,अश्विनी कोळी,सर्जेराव जाधव,प्रा.बशीर पठाण,रामप्रकाश प्रसाद, प्रताप जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post