चौथ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेसाठी गंगामाईच्या सेजल सुतार हिची निवडप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थीनी सेजल सुनील सुतार हिची चौथ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली .

यापूर्वीच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सेजल सुतार हिने  उज्वल यश संपादन केले आहे.त्यामुळेच तिची हरियाणा येथे होणा-या चौथ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली . याबद्दल ना.बा.एज्युकेशन संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा व जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे व क्रीडा शिक्षक शेखर शहा व सुहास पोवळे यांच्या उपस्थित तिला पुष्पगुच्छ देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच

ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन हरीष बोहरा , व्हाईस चेअरमन उदय लोखंडे , ट्रेझझर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडींगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांनी सेजल हिचे अभिनंदन केले. यावेळी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस.गोंदकर , उपप्राचार्य आर.एस.पाटील. , उपमुख्याध्यापिका सौ  एच..एस.भस्मे व पर्यवेक्षक  व्ही. एन . कांबळे यांनी देखील सेजल हिचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post