आपल्यातील सुप्तगुण ओळखून त्यातच प्रगती करा आणि भारतीय संस्कृती जपा.....इंद्रजित देशमुख.

 मुला मुलींनो आई बाबांच मान खालावेल अस वागू नका.... वसंत  हंकारे

    

प्रेस मीडिया लाईव्ह :

अकिवाट  (ता.शिरोळ) :  रमेशकुमार मिठारे  

आपल्यातील  सुप्तगुण ओळखून त्यातच प्रगती करा आणि  भारतीय  संस्कृती जपा इतरांवर अवलंबून न रहाता स्वतःच काम  स्वतःच  करा. ,अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले ,पहिली भारतीय  महिला अंतराळवीर कल्पना चावला 


यांचा आदर्श घ्यावा.समाज शिक्षित झाला पण संस्कारांची पायमल्ली होत आहे.ताणतणावात काम न करता आनंदाने जीवन जगा पाखरु  होऊन पाखरा सारखे जगा.आयुष्यात  दोन  गोष्ट मिळवल पाहिजे एक आनंद आणि दुसर मंगलम.असे मत माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी आपल्या अमृतवाणी तुन अकिवाट येथे आयोजित केलेल्या जैन युवा मंच व विद्यासागर शैक्षणिक संकुल यांनी आयोजीत केलेल्या कुटुंब व्यवस्था आणि संस्कार या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब पिरगोडा पाटील होते. यावेळी बाहुबली विद्यापीठ चे महामंत्री डी.सी.पाटीलसाहेब आपल्या मनोगतातुन म्हणाले की पालकांनी आपल्या मुला मुलींच्या समोर कसं वागावं हे ठरवलं की पुढची पिढी सक्षम झाल्याशिवाय रहाणार नाही असे व्यक्त केले.यावेळी आपल्या स्वागत व प्रस्तावना करताना, कार्यक्रमाचे  संयोजक तथा विद्यासागर हायस्कूल चे मुख्याध्यापक  पी.ए.मगदुम सर म्हणाले की समाजातील युवतींना सक्षमीकरण करण्यासाठी हा शिबिर घेतला असुन आज सर्व समाजातील व्यक्तींनी या कार्यक्रमास सहकार्य केल्याने हा कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले..

    दुपारी दुसऱ्या सत्रात युवती सक्षमीकरण या विषयावर सामाजिक प्रबोधनकार वसंत हंकारे म्हणाले मुला- मुलींनो आई बाबांच मान खालावेल असं वागू नका आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कसे दिवस काढलेत  ते जाणा क्षणिक मायासाठी बळी जाऊ नका,संसाराचा गाडा कसा चालवायचा हे फक्त एक स्त्रीच करू शकते त्यामुळे सासु- सुनानी एकमेकांना समजून आपलं आयुष्य आनंदाने जगा असा संदेश दिला.दुसर्या सत्राचे समारंभाध्यक्ष अरूण फरांडेसो आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मी तीन देशात फिरलो आहे पण माझ्या शाळेत माझा सन्मान माझ्या कुटुंबासमवेत केला आहे ते मी विसरू शकत नाही, असे व्यक्त केले. 

      या कार्यक्रमासाठी अकिवाट गावचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंटी रायनाडे , जैन युवा मंच व शैक्षणिक शिक्षण संकुल अकिवाट यांच्या या उपक्रमामुळे परिसरातून कौतुक होत आहे.

          या कार्यक्रमासाठी बाबासाहेब पाटील (कोषाध्यक्ष, बाहुबली विद्यापीठ, बाहुबली)गोमटेश बेडगे सर (संचालक, बाहुबली विद्यापीठ बाहुबली)व शाळेच्या केंद्रातील विद्यार्थी,पालक, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.आपल्या संगिताच्या तालावर व्यंकटेश गडदू या नवोदय बालकाने सर्वाना मोहीत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रुतिका रायनाडे, श्रध्दा गायकवाड, सायली गज्जन्नावर यांनी केले तर आभार अध्यापक नांद्रे सर यांनी मानले

Post a Comment

Previous Post Next Post