उरण तालुक्यातील राजिप शाळा जासई येथे शाळा पूर्व तयारी अभिनयाना अंतर्गत बाळ मेळाव्याचे आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

बुधवार दिनांक 20 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरवात प्रभातफेरी काढून करण्यात आली ढोल,ताशा,लेझीम, विविध घोषणाबाजी,वेशभूषा करून शिक्षक पालक, अंगणवाडी सेविका,वर्ग शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, कार्यक्रम प्रसंगी गणेश पूजन सरस्वती पूजन त्याच प्रमाणे रुपेश पाटील सर यांच्या सुंदर आवाजाने गणेशाची गाणं  सादर करत सर्व पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच स्वागत करण्यात आलं या मेळाव्याच प्रमुख उद्देश पहिली मधील विद्यार्थ्यांची बौध्दिक,शारिरीक, सामाजिक,भावनिक, भाषिक ,गाणितीय, क्षमताचा विकास हाच होय, विद्यार्थीनी बनवीलेल्या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन मा सरपंच संतोष घरत यांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमआतर्गत मा सरपंच संतोष घरत,उरण पंचायतीचे माजी सभापती नरेश घरत प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुंबईकर मॅडम यांनी शाळेचा आढावा आणि माहिती देऊन शाळेच्या पूर्व तयारी ची का गरज आहे हे महत्व पटवून दिले,


अध्यशिय भाषणात संतोष घरत यांनी शाळेय कमिटी आणि मुलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे याचा फायदा हा दखल पात्र विद्यार्थ्यांना नक्कीच झाल्या शिवाय रहाणार नाही

याच कार्यक्रमात स्वर्गीय मेघनाथ म्हात्रें यांच्या स्मृती प्रित्याथ शिरीष म्हात्रें यांनी शाळेला 15 घडयाळ भेट स्वरूपात दिली ,तसेच CCTV कॅमेरा च उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल,कार्यक्रमात उरण तालुक्यातील साहित्यिक तसेच  शाळेच्या उपशिक्षीका मिलन माळी यांच्या यांच्या गाण्यावर सर्व विद्यार्थ्यांना नृत्य सादर करून वातावरण आनंदीमय केले या कार्यक्रमा प्रसंगी शाळा व्यस्थापण कमिटी अद्यक्ष निता घरत, उपाध्यक्ष गणेश पाटील, सारिका पाटील, जयश्री  घरत, भालचंद्र म्हात्रे, दत्ता घरत, अरुण घाग,अर्चना घरत, योगिता म्हात्रे, ग्रा सदस्य गिरीष म्हात्रे, अपर्णा म्हात्रे, धर्मा पाटील, भूषण म्हात्रे, आंगणवाडी सेविका वंदना घरत ,ज्योती घरत, सुनंदा घरत, दीपा कांबळे,प्रथम संस्थेचे प्रतिक खुंटे कांशीराम सर,सुनीता पाटील, रणिता ठाकूर,प्रेरणा ठाकूर,यांनी उपस्थित रहाऊन कार्यक्रमात  सहभाग दर्शविला 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापिका मिनाक्षी मुंबईकर, सदानंद पाटील,माळी मॅडम,गावंड मॅडम,भोईर सर, दिपक पाटील कोळी सर, कडू सर,अस्वले सर,बुद्रुक सर,उज्वला म्हात्रे, माने मॅडम, यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम संपन्न केला

या कार्यक्रमाच सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक रुपेश पाटील यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली

Post a Comment

Previous Post Next Post